*कन्हान नवीन पुलिया ची पाहणी करुन तात्काळ उद्घाटन करण्याची मागणी*
*भाजपा पदाधिकार्यांचे विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन*
*लवकरच केंद्रीय मंत्री मा.नितिन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करणार – चंद्रशेखर बावनकुळे*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – पारशिवनी तालुक्यातील कन्हान नदी वरील नवीन पुलिया जवळपास पुर्ण होऊन एक महिन्याचा कालावधी झाला असुन सुद्धा पुलियाचे उद्घाटन कधी होणार अशी नागरिकां मध्ये सुरु असलेल्या चर्चेला उधाण आल्याने भाजपा पदाधिकार्यांनी अनुसुचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे यांच्या नेतृत्वात विधान परिषद सदस्य मा.चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा करुन तसेच त्यांना एक निवेदन देऊन तात्काळ नवीन पुलाची पाहणी करुन उद्घाटन करण्याची मागणी केली असता त्यांनी लवकरच केंद्रीय मंत्री मा.नितिन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करणार असे आश्वासन दिले आहे .
नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वर मागील आठ वर्षा पासुन करोडो रुपयाचा लागत ने आज पुलिया चे काम जवळपास पुर्ण होऊन एक महिन्याचा कालावधी झाला असुन सुद्धा शासन , प्रशासन व संबंधित अधिकारी कुणाची वाट पाहत आहे ? कि पुराना पुल जर्जर झाला असुन त्याची कालावधी संपल्यावर ही प्रशासन चे अधिकारी मोठ्या अपघात ची वाट व पुल कोसळण्याची वाट पाहत आहे काय ? अशी उलट सुलट चर्चा शहरा मध्ये सुरु असुन नवीन पुलिया चे उद्घाटन कधी होणार अश्या चर्चेला उधाण आले आहे . सध्या च्या परिस्थिति मध्ये पुरान्या पुलाची अवस्था जर्जर झाली असुन सुद्धा पुलावरुन जड़ वाहतुक , ट्रॅव्हल्स बसेस , फोरविलर , अश्या अनेक वाहतुक बिनधास्त पणे सुरु असुन मोठ्या अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नसुन मागील काही महिन्या पुर्वी ह्याच पुलावर तीन मोठे अपघात झाले असुन दोन युवकाचा मृत्यु झाला तर एक युवक गंभीर जख्मी होऊन वेळोवेळी उपचार मिळाल्याने युवक थोडक्यात बचावला .
इतके होऊन सुद्धा शासन , प्रशासन व संबंधित अधिकारी या कडे र्दुलक्ष करीत असुन नवीन पुलिया चे उद्घाटन कधी होणार अश्या चर्चेला उधाण आल्याने भाजपा पदाधिकार्यांनी अनुसुचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे यांच्या नेतृत्वात विधान परिषद सदस्य मा.चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा करुन तसेच त्यांना एक निवेदन देऊन तात्काळ नवीन पुलाची पाहणी करुन उद्घाटन करण्याची मागणी केली असता त्यांनी लवकरच केंद्रीय मंत्री मा.नितिन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करणार असे आश्वासन दिले आहे .
या प्रसंगी जिल्हा मंत्री जयराम मेहरकुळे , नगरसेवक राजेंद्र शेन्द्रे , तालुका संपर्क प्रमुख शैलेश शेळके , राजेश ठवरे , विशाल मुंजेवार , दामोधर चुलबुले सह आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .