विज्ञान प्रदर्शनी मध्ये विद्या मंदिर कोराडी शाळेचे सुयश

विज्ञान प्रदर्शनी मध्ये विद्या मंदिर कोराडी शाळेचे सुयश

*कोराडी प्रतिनिधि -दिलीप येवले*

*कोराडी*
तालुका विज्ञान प्रदर्शनी मध्ये विद्या मंदिर कोराडी शाळेचे सुयश
पंचायत समिती कामठी व शारदा मिशन स्कुल ऑफ होम सायन्स कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5, 6, 7 डिसेम्बर 2019 ला पार पडलेल्या तालुका विज्ञान प्रदर्शनी मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित विद्या मंदिर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय कोराडी शाळेतील वर्ग अकरावीचा विद्यार्थी फर्दिन खान याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याने पिझोइलेकट्रीसिटी चा दळणवळनात वापर ही प्रदर्शनी वस्तू सादर केली होती. वाढत्या प्रदूषणाला आला बसण्यासाठी तसेच विद्युत विरहित भारतीय रेल्वे अशी त्याची भविष्यातील मांडणी होती. अशाप्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा असे परीक्षकाच्या समोर त्यांने मांडले. फर्दिनला प्रतिकृतीच्या तयारीसाठी विज्ञान शिक्षिका अनिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौं. जे.व्ही. राऊत मॅडम , शाळा निरीक्षक श्रीमान हांडे सर, श्रीमान चोबीतकर सर आणि अक्रम सर यांनी फर्दिन चे शुभेच्छा देऊन कौतुक केले.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …