*सार्थ पब्लिक स्कुल चा झुला कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेला* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल* *कन्हान परिसरात चोरट्यांचे हौसले बुलंद , गुन्हेगारी वाढली*

*सार्थ पब्लिक स्कुल चा झुला कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेला*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*कन्हान परिसरात चोरट्यांचे हौसले बुलंद , गुन्हेगारी वाढली*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड वरील सार्थ पब्लिक स्कुल कन्हान येथील शालेय विद्यार्थ्या चा खेळण्याचा झुला रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
कन्हान शहरातील भरगच्छ लोकवस्तीत तारसा रोड वर असलेल्या सार्थ पब्लिक स्कुल कन्हान च्या आवारातील शालेय विद्यार्थ्याना खेळण्याकरिता असलेला लोंखडी झुला शनिवार (दि.३०) जुलै च्या रात्री १२.३० ते रविवार सकाळी ७ वाजता दरम्यान अज्ञात चोरटयानी वाहनात टाकुन चोरून नेल्याने शाळेचे संचालक भुषणराव निंबाळकर पोलीस स्टेशन ला चोरी ची तक्रार देण्यास गेले असता कन्हान पोलीस चोरीची तक्रार नोंद करण्यास आणाकाणी करित हरविली किंवा दुसरी काहीही तक्रार देण्यास म्हणत होेते. म्हणजे अश्याच चोरांना चोरी करू दयाच्या काय ? शाळेचे साहित्य चोरांनी चोरी केल्याने आपणास चोरीची तक्रार नोंद करावी लागेल अशा आग्रह केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात चोरटया विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .

*कन्हान परिसरात चोरट्यांचे हौसले बुलंद , गुन्हेगारी वाढली*

कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत या एका वर्षात कोळसा, रेती, डिझेल, तांबे, लोखंड, विधृत लोखंडी खांब, ताराची चोरी होतच असते. घरफोडी, शेती साहित्य, विहीर पंप, बोरवेल पंप, जनावरे, ट्रक, चार चाकी तर दुचाकी ची भरदिवसा चोरीचे प्रमाण दिवसे दिवस वाढु लागले तरी कन्हान पोलीस या चोरीच्या आरोपीना पकडण्यास अपयशी ठरत असल्याने चोरट्यांचे हौसले बुलंद होऊन चोऱ्या मोठा प्रमाणात वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण होऊन कन्हान थानेदार विलास काळे यांच्या कार्य प्रणालीवर वेगवेगळया चर्चा शहरात नागरिकात चांगल्याच रंगत आहे

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …