*ब्रेकिंग न्यूज*
*कन्हान सिहोरा घाट नदी पात्रात एक अनोळखी इसमाचा प्रेत मिळुन आल्याने खळबळ*
*प्रेत पोलीसांच्या ताब्यात , पुढील तपास सुरु*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सिहोरा घाट नदी पात्रात एक अनोळखी इसमाचा प्रेत मिळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे .
सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार आज शनिवार दिनांक ६ ला दुपारी ३ ते ५ वाजता च्या सुमारास काही गोताखोर युवक नामे राकेश मेश्राम ,अजय बावने , प्रकाश डोंगरे हे मासे पकडण्यासाठी सिहोरा घाट नदी पात्रात गेले असता त्यांना नदी मध्ये एक अनोळखी इसमाचा प्रेत तैरतांना दिसुन आला . त्यांनी पोलीस स्टेशन गाठुन सदर घटनेची माहिती दिली असता पोलीस निरीक्षक विलास काळे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले असता पोलीसांनी गोताखोर युवकांच्या मदतीने अनोळखी इसमाचा मृतदेह नदी पात्रातुन बाहेर काढला . कन्हान पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले .
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .