*पतंजली व ज्येष्ठ नागरिक मंडळाचा उपक्रम*
*आचार्य आयुर्वेदिक शिरोमणी श्री बाळकृष्ण जी महाराज यांच्या जन्म दिनी निशुल्क नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर व जडीबुटी दिवस झाला साजरा*
बेलोना – येथे 04/08/2022 गुरुवरला जेष्ठ नागरिक मित्र मंडळ व पतंजली योग समिती च्या वतीने माधवबाग हॉस्पिटल कोंढाली व श्री महात्मे नेत्र पेढी नागपूर नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर यांच्या वतीने .
श्री बजरंग बलीच्या मूर्तीला पुष्प माल्यार्पण करून महाराणा प्रताप सभागृह येथे
शिबिराचे उदघाटक मा,श्री तरुडकर नायब तहसीलदार नरखेड, श्री नामदेवराव कालमेंघ यांच्या अध्यक्षते जेष्ठांच्या ऊपस्थिती मध्ये दीप प्रज्वलन करून ऊदघाटन केले मान्यवरांचे स्वागत करून…
आयर्वेद शिरोमणी आचार्य श्री बाळकृष्णजीं महाराज यांना जन्म दिनाच्या शुभेच्छा व दीर्घायुष्याची कामना करून मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
नेत्र तपासणी व आरोग्य तपासणीला सुरुवात झाली डॉ, गौरव शेळके व समन्वयक ठाकरे यांच्या टीमने 120 लोकांच्या निशुल्क बीपी,शुगर,ईसीजी व आरोग्यवर योग्य सल्लादिला तसेच श्री महात्मे नेत्र पेढीचे डॉ,एस जे अली व टीमने 150 लोकांचे निशुल्क नेत्र तपासणी केली या शिबिराला जेष्ठ मान्यवर मधूकरजी गायधने जेष्ठ नारीक मंण्डळ तालुका अध्यक्ष,
गजाननराव भोयर काटोल जेष्ठ ना.मंडळ तालुका सचिव,
ज्ञानेश्वरजी टेकडे मंडळ तालुका सचिव , शरदजी मेंगळ जेष्ठ नागरिक मंडळ अध्यक्ष नरखेड ,
शोभारामजी चैव्हाण गाव मंडळ पूर्व अध्यक्ष , सुरेशजी पांढरकरसर, नारायणराव चरपे मोवाड मंण्डळ सचिव ,रामदयालजी राठोड गावमंडळ ऊपाध्यक्ष , अमरशिह सेंगर , कमलाकरजी दिवाण, ऊत्तमजी पुरी , नरेशजी चौव्हान जेष्ठ नागरिक मंचकावर प्रमुख म्हणून ऊपस्थित होते यांचे स्वागत अनिलजी डोईफोडे मंडळ ग्राम सचिव ,रमेशजी बरोले ,चंद्रशेखर मस्के यांनी पुष्पगुच्छ व
जेष्ठांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .
निशुल्क सेवा देणाऱ्या सर्व वैद्याचा पुष्प गुच्छ देऊन आभार करण्यात आले प्रास्ताविक व ऊपस्थितांचे आभार पुरुषोत्तम थोटे पतंजली नरखेड तालुका समन्वय समिती अध्यक्ष व जेष्ठ नागरिक मण्डल संघटन सचिव यांनी मानले . आचार्य आयुर्वेद शिरोमणी श्री बालकृष्णजी महाराज यांच्या जन्म दिनी निःशुल्क नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर तसेच
पतंजली व जेष्ठ नागरिक मंडळाच्या उपक्रमाला गावकरी जनतेने प्रचंड असा प्रतिसाद दिला.