*”आझादी का अमृत महोत्सव ” हर घर तिरंगा कार्यक्रमाची कन्हान शहरातुन सुरूवात*
*नेहरू युवा केंद्र व समता सांस्कृतिक , शैक्षणिक बहुउद्देश्यीय संस्था द्वारे पुढाकार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – नेहरू युवा केंद्र नागपुर, युवा व खेळ मंत्रालय भारत सरकार आणि समता संस्कृतीक, शैक्षणिक बहुउद्देश्यीय संस्था, कन्हान व्दारे पारशिवनी तालुक्या तील कन्हान शहरातुन ७५ वर्ष “आझादी का अमृत महोत्सवा ” निमित्त हर घर तिरंगा कार्यक्रमाची कन्हान शहरातुन सुरूवात करण्यात आली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारत स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्याला ‘आझादी का अमृत महोत्सव ‘ असं नाव देण्यात आलं आहे. आझादी का अमृत महोत्सव हा भारत सरकार च्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या लोकांचा, संस्कृतीचा आणि प्रगतीशील भारताच्या गौरवशाली इतिहासाचा गौरव करण्यासाठीचा एक उपक्रम आहे. या निमित्य नेहरू युवा केंद्र नागपुर चे स्वयंसेवक हे नागपुर जिल्ह्यातील प्रत्येक घरी जाऊन प्रचार प्रसार करित ” आझादी का अमृत महोत्सव ” साजरा करण्यास हर घर तिरंगा कार्यक्रम राबविणार आहेत. या निमित्य पारशिवनी तालुक्यात ७५ युवा मंडळ तसेच प्रत्येक तालुक्यात ७५ युवक मंडळे स्थापन करणार आहेत. ज्याची सुरूवात कन्हान शहरातुन करण्यात आली. यास्तव रिंकेश चवरे अध्यक्ष समता सांस्कृतिक, शैक्षणिक बहुउद्देशिय संस्था कन्हान, शैलेश शेळके सदस्य समता सांस्कृतिक, शैक्षणिक बहुउद्देशिय संस्था कन्हान, प्रविण हूड सदस्य नेहरू युवा केंद्र, आकाश घोगरे सदस्य नेहरू युवा केंद्र, प्रतिक्षा चवरे सदस्य समता सांस्कृतिक, शैक्षणिक बहुउद्देशिय संस्था कन्हान, श्री पप्पु चौधरी सामाजिक कार्यकर्ता कन्हान, रिषिकेश चवरे सह नगरवासी सहकार्य करित आहे .