*कांद्री येथे बुधवार १० आॅगस्ट ला भव्य महाआरोग्य अभियान शुभारंभ आणि रोगनिदान , उपचार शिबीर कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
कन्हान – कांद्री येथे स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सव निमित्य भुमीपुत्र युवा प्रतिष्ठाण बहुद्देशीय संस्था भुमीपुत्र महिला स्वयं सहायता बचत गट , कांद्री शालिनीताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटर , वानाडोंगरी , नागपुर यांचे संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य अभियान शुभारंभ आणि रोगनिदान , उपचार शिबीर कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि १० ऑगस्ट २०२२ ला सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शिव हनुमान मंदिर , धर्मराज शाळेच्या मागे , कांद्री ( कन्हान ) येथे करण्यात आले असुन या शिबिरात मेडिसिन , स्त्रीरोग , बालरोग , अस्थिरोग , नेत्ररोग , शल्यचिकित्सक , कान – नाक – घसा , त्वचारोग व दंतरोग तज्ञ या विभागाचे तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहतील . रक्तदाब व मधुमेह तपासणी आणि शिबीर स्थळावर उपलब्ध औषधीचे वितरण मोफत करण्यात येईल . डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर तपासणी रूग्णालयात निःशुल्क करण्यात येईल . शिबीर स्थळावरून रूग्णालयात जाण्याकरीता वाहनाची मोफत व्यवस्था . शहरातील व परिसरातील जास्तीत जास्त नागरीकांनी या मोफत तपासणी संधीचा लाभ घ्यावा , डॉक्टरांचा सल्ल्याने ज्या पेशंटला अधिक तपासण्या करणे आवश्यक असल्यास त्या सर्व तपासणी हॉस्पिटल मध्ये भरती करून निःशुल्क करण्यात येईल .
टीप – जनआरोग्य केंद्रांतर्गत हृदयरोग , मधुमेह ( शुगर ) श्वसनरोग , किडनी रोग , संधीवात , कंबरदुखी , सिकलसेल या आजाराचे कार्ड उपलब्ध राहतील . तरी आयोजित रोग निदान व आरोग्य शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी पुरेपुर लाभ घ्यावा असे कडकडीचे आव्हाहन आयोजक अतुल हजारे भुमीपुत्र युवा बहुदेशीय संस्था , कांद्री ग्रामपंचायत सदस्य सौ अरुणा हजारे यांनी केले आहे .