*येसंबा येथे आज़ादी का अमृत महोत्सव निमित्य भव्य रोगनिदान शिबीर थाटात संपन्न* *१४० नागरिकांनी शिबीराचा घेतला लाभ*

*येसंबा येथे आज़ादी का अमृत महोत्सव निमित्य भव्य रोगनिदान शिबीर थाटात संपन्न*

*१४० नागरिकांनी शिबीराचा घेतला लाभ*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान परिसरातील येसंबा (सालवा) येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य वेकोलि जवाहरलाल नेहरु हाॅस्पीटल कांद्री व येसंबा ग्राम पंचायत सरपंच धनराज हारोडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रोगनिदान शिबीरात १४० ग्रामस्थानी लाभ घेऊन अमृत महोत्सव निमित्य ” हर घर तिरंगा ” कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.


भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत असुन त्यास ‘आझादी का अमृत महोत्सव ‘ असं नाव देण्यात आलं आहे. अमृत महोत्सव हा भारत सरकार स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या लोकांचा, संस्कृती चा आणि प्रगतीशिल भारताच्या गौरवशाली इतिहासा चा गौरव करण्यासाठीचा एक उपक्रम आहे. या निमित्य सोमवार (दि.८) ऑगस्ट ला वेकोलि जवाहरलाल नेहरू हॉस्पिटल कांद्री व येसंबा ग्राम पंचायत सरपंच धनराज हारोडे यांच्या संयुक्त विद्यमाने येसंबा गावात भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन शिबीरात मोफत तपासणी करून एकुण १४० ग्रामस्थ लाभार्थ्यांना औषधी वितरण करून लाभ देण्यात आला.


या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित डाॅक्टरां ना, ग्राम पंचायत सदस्य, सदस्यांना, ग्रामस्थांना तिरंगा झेंडा वाटप करून ” हर घर तिरंगा ” कार्यक्रमाची सुरू वात करण्यात आली.
स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्य आपल्या घरावर देशाचा तिरंगा झेंडा लावुन या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभाग घेत आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात यावा असे आवाहन सरपंच धनराज हारोडे यांनी ग्रामस्थांना केले.
शिबीर व हर घर तिरंगा कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता वेकोलि मॅनेजर श्री राजेश यादव, डॉ. बि.के. प्रसाद, डॉ.एम. तेजस्विनी, श्री जगदिश चांडक , श्री अरूण सेलोकर, शारदा शेंडे, सरपंच धनराज हारोडे, ग्रामसेवक कु. मेघा मेश्राम तसेच गावातील ग्रामस्थानी बहु संख्येने उपस्थित राहुन सहकार्य केले.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …