*कळमेश्वर ब्राम्हणी शहरात कडकडीत बंद*
*आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी*
*कळमेश्वर पोलिसांचे कौतुकास्पद कार्य*
*पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज*
विशेष प्रतिनिधी सतीश नांदे कळमेश्वर
कळमेश्वर-
दिं 8 नोव्हेंबर रोजी कळमेश्वर तालुक्यातील लिंगा या गावालगत असलेल्या शेताजवळ एक मुलगी वय पाच तिच्यावर आरोपीने अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली होती.मृतक ही 6 डिसेंबर रोजी आपल्या लिंगा या गावातच राहत असलेल्या आजी कडे जातो म्हणून घरातून निघाली परंतु ते परत न आल्याने तिचा शोधाशोध घेतला परंतु ती कुठेच सापडली नाही करिता पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली होती.याप्रकरणी पोलिसांनी तपास चक्रे फिरवत आरोपी संजय पुरी हा संजय भारती यांच्या शेतात काम करीत असलेल्या सालदार याला एका तासात अटक केली परंतु या झालेल्या घटनेचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रात उमटले असून झालेल्या कृत्याबद्दल सर्वत्र नीती निषेध नोंदवण्यात आला. आरोपीला फाशी देण्याची मागणी सर्वस्तरावरून होत आहे व आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून या प्रकरणामुळे कोणती अनुचित घटना घडू नये म्हणून सावनेर,काटोल,बुट्टीबोरी,मौदा केळवद , रामटेक,खापा व कोंढाळी येथून अतिरिक्त पोलीस बल बोलावण्यात आले होते आरोपीस आज सत्र न्यायालय नागपूर येथे हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपीला 13 डिसेंबर पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड दिला आहे.
काल दिनांक 8 डिसेंबर रोजी साडे नऊ वाजताच्या दरम्यान
शवविच्छेदनानंतर मुलीचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. मृतदेहावर घराशेजारीच असणाऱ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले असून, या घटनेची नोंद अपहरण, अत्याचार,पॉस्को, अनुसूचित जमाती कायदा आणि खून कायद्यांर्तगत झाली आहे.
कळमेश्वर ब्राम्हणी बंद शांततेत
सकाळी आठ वाजता तळ्याची पार कळमेश्वर येथून आरोपीला फाशी द्या असा संतप्त नागरिक व सर्वपक्षीय मोर्चा निघाला या मोर्चामध्ये आरोपीला फाशी द्या अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हा काढण्यात आलेला मोर्चा बाजार चौक,बस स्टॅन्ड,ब्राम्हणी फाटा या रस्त्यावरून काढण्यात आला या अत्याचाराच्या निषेधार्थ कळमेश्वर आणि ब्राह्मणी तील दुकानदारांनी आपले दुकान बंद ठेवले होते‘बंद’चे आवाहन करत काढलेल्या फेरीला कळमेश्वर ब्राह्मणी तील व्यापारी, दुकानदारांनी प्रतिसाद दिला.अचानक ‘बंद’चे आवाहन केल्यामुळे शहरात बाजारासाठी बाहेरगावाहून आलेल्यांना परत फिरावे लागले शाळा कॉलेज काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुटी देण्यात आली होती हा मोर्चा शांततेने पार पडला असून कोणतीही अनुचित प्रकार घडला नाही.
पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
दिनांक 8 डिसेंबर रोजी रात्री 12 ते 12.30 च्या दरम्यान काही तरुणांनी झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी पोलिस स्टेशन समोर येऊन घोषणा दिल्या व पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतू काही तरुण यांनी पोलीस स्टेशन समोर लावण्यात आलेले सुरक्षा कवच (ब्यारिकेत)तोडण्याचा प्रयत्न केला व पोलिसांनी त्यांना विनंती करून सुद्धा ते काहीच एकूण घेत नसल्याने पोलिसांना त्यांना पांगण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
मृतकाच्या आईवडिलांनी दिले निवेदन
मृतकाची आई हिने आपल्या मुलीवर केल्याच्या अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी लिंगा गावातील नागरिकांसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण,मोनिका राऊत यांना निवेदन दिले याप्रसंगी पोलीस निरीक्षक मारोती मुळूक,तहसीलदार कळमेश्वर सचिन यादव, नायब तहसिलदार संजय भुजाडे,पोलीस उपविभागीय अधिकारी सावनेर,पोलीस निरीक्षक सावनेर कोळी साहेब व इतर अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांनी काढलेल्या मोर्चामध्ये सरकारकडे केल्या खालील मागण्या..
आज रोजी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये नागरिकांनी झालेल्या प्रकरणाचा सर्वस्तरीय निषेध करून आरोपीला लवकरात लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी, सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यात यावे, परिवाराला पोलीस संरक्षण देण्यात यावे, शासनाकडून पीडित परिवारास पन्नास लक्ष रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, पिडीत कुटुंबाला शासनाकडून आबादी जागा आणि घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देण्यात यावी, संपूर्ण न्याय प्रक्रियेसाठी शासनाने वकील व विधी सहाय्य त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे, सदर प्रकरणासाठी स्वतंत्र समिती गठन करण्यात यावी, आंदोलकांवर लाठीचार्ज आणि आंदोलनातील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे जप्त करण्यात आलेल्या आंदोलकांच्या गाड्या परत करण्यात यावे या सर्व मागण्या 15 दिवसाच्या आत मंजूर कराव्या अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा याप्रसंगी का नागरिकांनी काढलेल्या आंदोलनादरम्यान दिलेल्या निवेदनात दिला आहे. सदरचे निवेदन अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत तहसीलदार सचिन यादव आणि ठाणेदार कळमेश्वर मारुती मुळक यांना देण्यात आले.
पीडितेला लवकर न्याय मिळून देऊ -आमदार केदार
झालेली घटना ही अत्यंत घृणास्पद व दुःखदायी असून या घटनेचा मी निषेध करीत असून आरोपीला लवकर फाशीची शिक्षा मिळावी म्हणून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालावा यासाठी प्रयत्न करणार आहे.तसेच अश्या समाजविकृत लोकांवर आळा घालण्यासाठी समाजातील नागरिकांनी प्रयत्न करावे व तसेच कोणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये व कायद्याचे पालन करावे अशी विनंती त्यांनी पंचायत समिती येथे आयोजित मोर्चात सहभागी नागरिकांना केली.
कळमेश्वर पोलिसांचे कार्य अभिनवस्पद
झालेल्या घटनेचा छडा काही तासातच लावत कळमेश्वर पोलीस निरीक्षक मारोती मुळूक,दिलीप सपाटे व इतर कर्मचारी यांनी तात्परता दाखवीत आरोपी यास घटनास्थळालवरून मोठ्या शिपायतीने आरोपीला संशयास्पद अटक केली व पोलिसी खाक्या दाखवत आरोपी कडून अत्याचार व हत्येची कबुली करून घेतल्याबद्दल कळमेश्वर पोलिस ठाण्याचे ठाणेदार मारुती मुळक यांचे सर्व स्थरावरून अभिनंदन केले जात आहे.