*मोबाईल वर अश्लील मेसेज करुन केला विनयभंग*
*फिर्यादीच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल*
*दोन्ही आरोपी फरार*
सावनेर – पो.स्टे . सावनेर हद्दीत राहणार्या आरोपीताने महिलेला मोबाईलवर अश्लील मेसेज करुण विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस येत आहे.
*दिनांक १०/०८/२०२२ चे 7 .३० वा . ते दिनांक १०/०८/२०२२ चे 8.०० वा . दरम्यान फिर्यादी वय ३५ वर्ष हिला आरोपी क्र . १ प्रशांत ठाकरे , वय ४७ वर्ष रा . पाटील हॉस्पीटल जवळ सावनेर याने माहे जुलै २०१ ९ पासुन ते सन २०२० पर्यंत फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर मॅसेज करून प्रपोज केले . फिर्यादी ने आरोपी क १ ला हटकले असता आरोपी क १ ने फिर्यादीच्या मोबाईलवर अश्लील मॅसेज करून विनयभंग केले . त्यामुळे फिर्यादीचे पतीने आरोपी क १ ला घरी जावून त्यांच्या पत्नीला सर्व हकिकत सांगितली व त्यांना समजाविले फिर्यादीचे पतीने आरोपी क्र . १ च्या पत्नीला व मुलाला का सांगीतले या कारणावरून आरोपी क १ याने फिर्यादीचे पतीला मारण्याची धमकी दिली .*
*दि १०/८/२०२२ रोजी सायंकाळी 7-30 ते 8-00 वाजताचे दरम्यान फिर्यादीचे पती हे त्यांच्या ऑफीस मधुन त्यांच्या कारने घरी परत येत असतांना खापा फाटा सावनेर येथे आरोपी क १ ने याला जाब विचारण्याकरीता खापा फाटा सावनेर येथे आले असता आरोपी क १ हा फिर्यादीला बघुन घरून निघुन गेला . त्यामुळे फिर्यादी ही तीचे पती सोबत आरोपीच्या घरासमोर जावुन आरोपी क १ यास आवाज दिला असता आरोपी क २. हर्ष प्रशांत ठाकरे , रा . पाटील हॉस्पीटल जवळ सावनेर हा घरा बाहेर येवून फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली . सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे . सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम ३५४ ( डी ) , २ ९ ४ , ५०६ भादंवी . कायद्यान्वये अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे .
*आरोपी सध्या फरार असुन आरोपीतांचा शोध घेणे सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास ठाणेदार मारुती मुळुक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी निशांत फुलेकर करीत आहे .*