*भरधाव ट्रकच्या धडकेत आशा वर्कर महिला ठार.*
*कर्तव्या वरुण घरी परतत असतांना काळाने केला घात*
पाटनसावंगी प्रतिनिधि-अक्षय चिकटे
पाटणसावंगी.कामे अटोपुण घरी पायी जात असलेल्या आशा वर्कर महिलेचा भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ५.३० वाजता पाटणसावंगी बायपास रोडवरील पाण्याच्या टाकी जवळ घडली. संगीता गणपत भोयर (वय ४०, रा. इटनगोटी ता.सावनेर) असे मृत महिलेचे नाव आहे.
संगीता भोयर या त्यांच्या नातेवाईक माजी सरपंच वर्षा सुधाकर भोयर यांच्यासोबत पाटणसावंगी वरुन बायपास रस्त्याने इटनगोटी येथे त्यांच्या घरी नेहमी प्रमाणे आजही घरी पायी जायला निघाल्या बायपास रोडने येथील पाण्याच्या टाकीजवळ धापेवाडा कडून ट्रक (RJ 17 GA 7854) चालकाने पायी जाणाऱ्या संगीता भोयर व वर्षा भोयर यांना धडक दिली. यावेळी संगीता ह्या ट्रकच्या पाठीमागच्या चाकात आल्याने चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले असता डॉक्टरांनी सांगिताला मृत घोषित केले नागरिकांनी पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या ट्रक चालक राव अकलेरा रा.जलवारा राजस्थान यास काही अतरावर पकडले. पोलिसांनी सावनेर येथील रुग्णालयामध्ये त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पाटणसावंगी पोलिस चौकीत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करुन त्यांच्यावर भा द वी कलम 219,304 लावण्यात आले असुन पुढील तपास निशांत फुलेकर , कृष्णा जुनघरे करीत आहे. भोयर यांचे पती गणपत भोयर शिंपीचे काम करीत असून त्यांना दोन मुले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.सावनेर तालुक्यातील वाकी व गोसेवाडी रेतीघाटची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यापासून दररोज या दोन्ही घाटातून पाटणसावंगी बायपास मार्गाने ओवरलोड रेती ट्रकचे दररोज येजा असते तसेच पाटणसावंगी बाहेरुन महामार्गावर टोल नाका असल्याने तो टोल वाचविण्यासाठी ह्या सर्व गाड्या या मार्गाने प्रवास करतात