*15 ऑगस्ट स्वतंत्र दिवशी मोवाड मध्ये ध्वजारोहण*
नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
नरखेड़ – सर्व संस्थाकडून , व्यापारी संघाकडून , पोलिसविभागाकडून , मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली .भारत माता कीं जय , वंदे मातरम चे नारे देण्यात आले. सर्वानी घरोघरी तिरंगा लावण्याचे आव्हान करण्यात आले.ते लोकांनी पाळले .झेंड्याचा कुठेही अपमान होणार नाही याची काळजी घेण्यात आली .कुठेही अनर्थ घडला नाही .
नगर परिषद कार्यालय येथे पल्लवी राऊत मुख्याधिकारी यांनी ध्वजारोहण केले . .न.प .उच्च मा.शाळा येथे ज्ञाणेश्वर दारोकर मुख्याध्यापक , शिवाजी महाविद्यालय येथे किशोर झीलपे प्राचार्य , हुतात्मा स्मारक येथे केशव कंळबे कर्मचारी व लोकसत्ता प्रा .शाळा येथे वैभव गणोरकर मुख्याध्यापक , प्राथमिक पिवळी शाळा येथे रत्नमाला चौधरी मुख्याध्यापिका , इंदिरा गाँधी प्रा शाळा येथे श्रीमती कुसुमावती साठोणे संचालिका , पोलिस चौकी येथे साहेबराव मसराम पो .जमादार मोवाड , प्राथमिक आरोग्य केन्द्र येथे दीक्षा मूलताईकर जी.प . सदस्य नागपूर यान्च्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले . समता शिक्षण महाविद्यालय येथे सुरेश खसारे माजी नगराध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले . शाळेतील सांस्क्रुतिक कार्यक्रम पाऊसअसल्यामुळे नगर परिषद सांस्क्रुतिक सभागृह येथे घेण्यात आला .कार्यक्रमाला सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर व नगर परिषद कर्मच्यारी व माजी पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .