*येसंबा ग्रामपंचायत येथे विद्यार्थांना फळ वितरित करुन ७५ वा स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा*
कन्हान – ऋषभ बावनकर
कन्हान – कन्हान परिसरातील येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिवस विविध कार्यक्रमाने थाटात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी सरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असुन
प्राथमिक शाळा येसंबा येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुखदेव पानतावणे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले व भरारी महिला ग्रामसंघ येसंबा द्वारे विद्यार्थांना फळ वितरित करुन स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी येसंबा ग्रामपंचायत उपसरपंच रविन्द्र बांगडे , ग्रामसेवक कु. मेघा मेश्राम ग्रामपंचायत सर्व सदस्यगण , भरारी महिला ग्रामसंघाच्या अध्यक्ष ,सचिव ,लिपीक , प्राथिमिक शाळा येसंबाच्या मुख्याध्यापिका शिक्षीका, आय.सी.आर.पी.,अंगणवाडी सेविका,आशावर्कर,अंगणवाडी मदतनिस,ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग,गावातील युवा वर्ग, प्रतिष्ठीत नागरिक, बचत गटाच्या महिला, विद्यार्थी गण प्रामुख्याने मोठ्या संख्येत उपस्थित होते.