*कन्हान ला भाजप द्वारे अमृत महोत्सव निमित्य काढली बाईक रैली*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – शहरात भारतीय जनता पार्टी द्वारे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य गांधी चौक पोलीस स्टेशन पासुन ते जे एन हाॅस्पील गेट कांद्री पर्यंत भव्य बाईक काढुन महापुरुषांच्या व भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन विनम्र अभिवादन करीत अमृत महोत्सव साजरा करण्यात आला .
शासनाच्या आदेशा नुसार भारतीय स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सव निमित्य संपुर्ण देशात जागो जागी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असुन रविवार ला कन्हान येथे भाजपा पारशिवनी तालुका , कन्हान , कांद्री , टेकाडी शहर , यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बाईक रैली चे आयोजन करण्यात आले होते . या रैलीचा शुभारंभ कन्हान नदी वरील नवीन पुलिया येथे रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी , तालुका अध्यक्ष अतुल हजारे , भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या नेतृत्वात राष्ट्रगीत गायन करुन , वंदे मातरम.. वंदे मातरम च्या जयघोष करीत हवेत तिरंगा फुग्याचे गुब्बारे सोडुन करण्यात आला असुन बाईक रैली कन्हान पोलीस स्टेशन जवळ गांधी चौक येथे आली असता तेथे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करण्यात आले असुन राष्ट्रीय महामार्गा ने आंबेडकर चौक येथे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करण्यात आले . त्यानंतर बाईक रैली ही सात नंबर नाका येथे पोहचली असता तेथे सुजाता बुद्ध बिहार येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे यांच्या हस्ते पुष्प हार माल्यार्पण करण्यात आले असुन रैली महामार्गाने जे एन हाॅस्पील गेट कांद्री येथुन परत भारत माता चौक , धन्यवाद गेट कांद्री येथे आली असता तेथे अखंड भारत मातेच्या प्रतिमेचे तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले असुन भव्य बाईक रैलीचे समापन महात्मा गांधी चौक कांद्री येथे भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व राष्ट्रगीत गायन करुन वंदे मातरम.. वंदे मातरम च्या जयघोष करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
या प्रसंगी सुनिल लाडेकर , कामेश्वर शर्मा , संजय रंगारी , भरत सावळे , महेंद्र चव्हान , राजेंद्र शेंदरे , अजय लोंढे , मनोज कुरडकर , दिपनकर गजभिये , सचिन वासनिक , रिंकेश चवरे , रवि महाकाळकर , विक्की सोलंकी , शैलेश शेळके , स्वाती पाठक , सुषमा मस्के , सरिता लसुंते , लक्ष्मी लाडेकर , सुनंदा दिवटे , मीना कळंबे , आकाश वाढणकर , हितेश साठवणे , लीलाधर बर्वे , शिवाजी चकोले , गुरुदेव चकोले , सुरेंद्र चटप , सौरभ पोटभरे , रोहित चकोले , अमिष रुंघे , सुरेंद्र बुधे , अलदीराम कनोजिया , चंद्रकांत बावणे , विजय पोटभरे , सचिन कांबळे ,गणेश किरपान , विनोद कोहळे , पौर्णिमा दुबे , किरण चकोले सह आदि भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .