*गहुहिवरा शिवारातील शेतातुन लोखंडी साहित्य अज्ञात चोराने केले चोरी*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल , आरोपीचा शोध सुरु*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा गहुहिवरा शिवारातील प्रतिक संगितराय यांच्या शेतातुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी एकुण ४,५०,००० रुपयांचे लोखंडी साहित्य चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार शुक्रवार दि १२ आॅगस्ट ला सायंकाळी ०६:१५ वाजता ते रविवार दि १३ आॅगस्ट ला सायंकाळी ०७.०० वाजता च्या सुमारास फिर्यादी नामे प्रतिक संगितराय वय ३४ वर्ष राहणार इंद्रप्रस्थ ले आउट स्वावलंबी नगर , नागपुर यांचे मौजा गहुहिवरा शिवारात २.३२ एकर शेत आहे . सदर ठिकाणी त्यांनी व्यवसाय करीता लोखंडी गोडाउन बांधकामासाठी २ महिण्या अगोदर २२ टन लोखंडी साहित्य अंदाजे किंमत १२ लाख रुपए असे विकत घेतले होते . साहित्याचे देखरेख करीता दिवसा सुरक्षा गार्ड ची नेमणुक केली असुन गार्ड सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०७.०० वा . पर्यंत हजर राहतो . तसेच सामान बघण्याकरीता सदर ठिकाणी प्रतिक संगितराय हे स्वतः येत जात होते . शुक्रवार दि १२ आॅगस्ट ला प्रतिक संगितराय यांनी शेतात जावुन सामान चेक केले व दुपारी ०१.३० वाजता च्या दरम्यान घरी निघुन गेले . शनिवार दि . १३ आॅगस्ट ला सकाळी ९:३० वाजता दरम्यान प्रतिक संगितराय यांच्या शेतातील सुरक्षा गार्ड नामे – विजय चौधरी रा . खंडाळा याने प्रतिक यांना फोन व्दारे सांगितले की , शेतातील बांधकामासाठी असलेले काही लोखंडी साहित्य कोणीतरी चोरुन नेले आहे . असे सांगितले वरुन प्रतिक संगितराय हे सदर ठिकाणी पोहचले व साहित्याची पाहणी केली असता अंदाजे लोखंडी ३ टन परलीन किंमत १,५०,००० / – रुपए . कनेक्टर २ टन किंमत . १,००,००० / – रु . , २ टन पाईप किंमत . १,००,००० / – रु . , टायरॉड ५०० kg किंमत . ५०,००० / – रु . तसेच इतर लोखंडी ५०० kg किंमत . ५०,००० / – रु . असे एकुण किंमत . ४,५०,००० / – रु . चा लोखंडी गोडाउन बांधकामासाठी लागणारा माल दिसुन आला नसुन शेतातील लोखंडी गोडाउन बांधकामाचे साहित्य कोणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी प्रतिक संगितराय यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे ला आरोपी विरुध्द कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सतिश मेश्राम हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .