*कन्हान नगर परिषद द्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा* *विविध कार्यक्रमाचे आयोजन संपन्न*

*कन्हान नगर परिषद द्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा*

*विविध कार्यक्रमाचे आयोजन संपन्न*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान ला नगर परिषद कन्हान-पिपरी द्वारे क्षेत्रात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असुन हर घर तिरंगा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यात आला .


सोमवार दिनांक १५ आॅगस्ट ७५ व्या स्वातंत्र्य दिवस निमित्य नगर परिषद द्वारे सकाळी ७.३० वाजता नगर परिषद पासुन प्रभात फेरी वाज्या-गाज्यासह, हातात तिरंगी फुग्यांचा गुच्छ, राष्ट्रध्वज घेऊन काढण्यात आली असुन फेरी कन्हान शहरात फिरवून नगर परिषद कार्यालयात संपन्न करण्यात आली . त्यानंतर नगर परिषद येथे नगराध्यक्षा सौ. करुणाताई आष्टनकर , उपाध्यक्ष मा.योगेंद्र रंगारी सह आदि मान्यवरांचा हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सर्व प्रथम पदाधिकारी यांचे नगर परिषद कर्माचारी यांचे हस्ते स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. करुणाताई आष्टनकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिवाजी नगर येथील शालेय मुलींच्या चमू द्वारे पथनाट्य सादर करण्यात आले असुन उपस्थित मान्यवरांनी सदर पथनाट्याचे कौतुक केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. करुणाताई आष्टनकर यांनी स्वातंत्र्य दिवसा वर उपस्थितांना मार्गदर्शन करुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा या उपक्रम अंतर्गत राष्ट्रध्वजाचे महत्व व सन्मान विषयी माहिती दिली . तसेच सर्व नगरसेवक , नगरसेविका व न. प. कर्मचारी वृंद यांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

या प्रसंगी नगर परिषद उपाध्यक्ष योगेंद्रजी रंगारी , नगरसेवक राजेश यादव , राजेंद्र शेंद्रे , डायनल शेंडे , नगरसेविका मोनिका पौनीकर , संगीता खोब्रागडे , वर्षा लोंढे , वंदना कुरडकर , अनिता पाटील , कल्पना नितनवरे , रेखा टोहणे , सुषमा चोपकर , नप कार्यालय अधीक्षक सुशांत नरहरे , पाणीपुरवठा अभियंता फिरोज बिसेन , स्थापत्य अभियंता श्री. नामदेव माने , अग्निशमन पर्यवेक्षक हर्षल जगताप , संगणक अभियंता प्रिया शिरसाठ , कनिष्ठ लिपिक रवींद्र धोटे , देवीलाल ठाकूर , निरंजन बढेल व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …