*शिवसेना महाराष्ट्र वाहतुक सेना द्वारे रॅली काढुन स्वातंत्र्य दिवस साजरा*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – शिवसेना महाराष्ट्र वाहनतुक सेना द्वारे 40 ऑटोरिक्षां सह रॅली काढून स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. सत्रापूर येथून महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत निघालेली ही रॅली आंबेडकर चौक, शिवाजी नगर, शहीद चौक मार्गे एम.जी.नगर मार्गे भ्रमण करुन रैलीचे कन्हान पोलीस स्टेशन गांधी चौक येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन समापन करण्यात आले .
या प्रसंगी कन्हान – पिपरी नगर परिषद च्या नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , नगरसेवक डायनल शेंडे , नगरसेविका मोनिका पौनीकर , वालाल पात्रा , युवासेना रामटेक विधानसभा सचिव लोकेश बावनकर , कन्हान शहर प्रमुख समीर मेश्राम , सामाजिक कार्यकर्ते उमेश पौनीकर , आयोजक सावन लोंढे , अजित कांबळे , सिलिम शेख खान , प्रकाश पाटील , राज गायकवाड , बादल लोंढे , चांद गायकवाड , अर्जुन लोंढे , सावन रोकडे , प्रीतम कांबळे , रवींद्र रोकडे , विजय कांबळे , रोशन लोंडे , सनी कांबळे , बबलू बिसने , राकेश पत्रे , राज लोंढे , अनिल पात्रे , महेंद्र शेंडे , संजू पात्रे , डॉ. राम पात्रे , महिपाल पात्रा , अजय गायकवाड , अस्लम शेख , धरम कापसे , अंकुश बचले , आदित्य जांभूळकर , राजा मानकर , दीपक शिंदे , माहेर इंचुलकर , मोहम्मद शरीफ , सह आदि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.