*कन्हान परिसरात १५ ऑगस्ट ७५ व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवाने मोठ्या उत्साहात थाटात साजरा* *विविध संघटने द्वारे विविध ठिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान परिसरात १५ ऑगस्ट ७५ व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवाने मोठ्या उत्साहात थाटात साजरा*

*विविध संघटने द्वारे विविध ठिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात १५ ऑगस्ट २०२२ ला भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव विविध संस्था, सामाजिक, राजकीय संघटना व्दारे मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला.

*विदर्भ टेलर्स असोशियशन कन्हान-कांद्री*

विदर्भ टेलर्स असोशियशन कन्हान-कांद्री च्या व्दारे (दि.१५) ऑगस्ट २०२२ ला सकाळी १० वाजता ७५ व्या स्वातंत्र्य दिवसा निमित्य प्रमुख अतिथी मा. प्रेम भाऊ रोडेकर व असोशियशन च्या कोषाध्यक्ष सौ. सुनिताताई जयस्वाल याच्या हस्ते ध्वजारोहन करण्या त आले. या प्रसंगी विदर्भ टेलर्स असोशियशन चे पदाधिकारी. प्रभाकर बावने , श्रीकृष्ण ऊके , नरेंद्र खडसे , कल्लुजी नायक , कुंडलिक नागपुरे आदी प्रामुख्याने उपस्थितीत स्वातंत्र्या अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विदर्भ टेलर्स असोशियशन चे महेन्द्र वानखेडे, सागर ऊके, सौ. पुष्पलता बावने, पोर्णिमा सोमकुवर, सुशिला फुलारे, गिता गुप्ता, राजे श्वरी खंदारे, पवित्रा पाटील, सुबीया शेख, निशा पुरी, सुहानी वानखेडे, एकनाथ खंदारे, संदीप छानिकर, संदीप फरकाडे, मनोज मेश्राम, अमित वानखेडे, मनो हर डहाडे, अरविंद मोहीतकर, आसु कोल्हे आदी सह नागरिक उपस्थिती होते.

 

*हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान*

हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेचे संचालक मा. नरेन्द्र वाघमारे यांचा हस्ते भारत माता, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, फाति मा शेख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका वंदना रामापुरे यांनी विद्यार्थांना व नाग रिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित नागरिकांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी जयश्री पवार, हेमंत वंजारी, हेमंत चांदेवार, आयशा अंसारी, कीर्ती वैरागडे, नेहा गायधने, वसती गृहाचे अधिक्षक गणेश रामपुरे सह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक हेमंत चांदेवार यांनी केली व आभार नेहा गायधने यांनी मानले .

*एम जी एस संविधानिक हक्क संगठन द्वारे स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा*

एम जी एस संविधानिक हक्क संगठन च्या वतीने ७५ वा स्वातंत्र्य दिवस विविध कार्यक्रमाने थाटात साजरा करण्यात आला .
विष्णु लक्ष्मी नगर येथे शाळेतील लहान मुलांना शमशेर पूरवले यांच्या हस्ते तिरंगे झंडे व मिठाई वाटप करण्यात आली असुन हेंडीक्याफ व मतिमंद नागरिकांचे प्रमाण पत्र बनवून देण्यात आले .
या प्रसंगी एम जी एस संविधानिक हक्का संघटने चे अध्यक्ष गणेश भालेकर , उपाध्यक्ष शमशेर पुरवले , सचिव अर्जुन पात्रे , सदस्य प्रीतम शिंदे , जैन इंचूलकरल , किसना खडसे , राहुल हातागड़े , अजय इंचुलकर , आकाश पात्रे , सुदेश हातागडे , आम्मू पात्रे , इंदल पुरवले , मुकेश पात्रे , सुधीर पोनिकर , नेहरू गायकवाड , किरण पिटारे , विकास पाटिल , अतुल बनकर , बल्लू पुरवले , राहुल बोरसरे , राहुल पात्रे , सह आदि नागरिक उपस्थित होते .

*सर्व धर्म समभाव संघटन , कन्हान*

सर्व धर्म समभाव संघटन द्वारे ७५ व्या स्वातंत्र्य दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर , महात्मा गांधी , शहिद भगत सिंग यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी पोलीस निरीक्षक विलास काळे व कन्हान – पिपरी नगर परिषद उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले असुन विद्यार्थांना बॅग वितरित करण्यात आली . कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी व नागरिकांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या नगरसेवक गुंफा तिडके , रेखा टोहणे , चंदन मेश्राम , प्रशांत मसार , गणेश खांडेकर , दिलीप निंबोने , कुंदन रामगुंडे , अविनाश हातागडे , सबीर भाई सह आदि नागरिक उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …