*कन्हान नदी वरील नवीन पुलिया चे उद्घाटन १ सप्टेंबर ला गडकरी यांच्या हस्ते होणार*
*पत्रकार परिषद मध्ये माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी दिली माहिती*
*ब्रिटिश कालीन पुलिया जर्जर , जनप्रतिनिधि व संबंधित अधिकार्यांचे दुर्लक्ष*
*मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला असुन 1 सप्टेंबर 2022 रोजी पुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती माजी आमदार मा.डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कन्हान नदी वरील जुना झालेल्या ब्रिटिश कालीन पुलाची कालावधी संपल्यावर देखील सुद्धा नदी जुन्या पुलिया वरून जड व अवैध वाहतुकाची आवाजावी मोठ्या प्रमाणात सुरु आहे . शिवाय पुलाचा दोन्ही बाजूला लावण्यात आलेली रेलिंग काही ठीक ठिकाणा वरून तुटली असुन रेलिंग ला सुरक्षा देणारे दगड – वीटा निघत असल्याने पुल कोसळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या संबंधित स्थानिक सामाजिक लोकहीतात सदैव पूढे असणारे कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी , महा.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने , रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशीष जैस्वाल , सह अनेक जनप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकार्यांना निवेदन पत्र दिले असुन तरी देखील संबंधित जनप्रतिनिधी व अधिकारी जुन्या पुलाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे लोकांकडून बोलल्या जात आहे.
दिडशे वर्ष पुर्ण होत असल्याने जुन्या पुला वरुन वाहतुक सुरक्षित नसून बंद करण्याचे ब्रिटिश सरकारकडून पत्र भारत सरकारला मिळाल्याचे स्पष्ट होताच स्थानिक पत्रकारांनी जनतेला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तमान पत्रात विषय लावून धरल्याने वर्ष २०१४ मध्ये माजी रस्ते वाहतुक मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांच्या हस्ते नवीन पुलाचे भुमिपुजन करण्यात आले होते. 35.92 कोटी खर्च करून बांधण्यात येणारा हा पूल 390.95 मीटर लांब . ज्याच्या समोर 27.925 मीटर लांबीच्या दोन गल्ल्या आहेत. पुलाची रुंदी 14.80 मीटर असुन ज्यामध्ये दोन्ही बाजूंना दीड मीटरचा फूटपाथ सोडण्यात आला. करारानुसार पुलाचे काम २१ महिन्यांत पूर्ण करायचे होते. मात्र पुलाच्या बांधकामात वारंवार येणाऱ्या अडचणी, संथ गती मुळे होत असल्याने पुलाचे काम दुसऱ्या कंपनीला सोपविण्यात आले. त्यामुळे कामात गती आल्याने पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण होऊन एक ते दोन महिन्याचा कालावधी झाला असुन सुद्धा पुलाचे उद्घाटन कधी होईल व वाहन चालकांना, नागरिकांना कधी सुटका भेटणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. रेल्वे गेट मुळे वारंवार होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी व भाजप चे रिंकेश चवरे , शैलेश शेळके , नगरसेवक राजेंद्र शेंदरे यांनी भाजपा महा.प्रदेशाध्यक्ष व विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन पुला बाबत चर्चा करून निवेदन सादर केले होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदर विषय गांभीर्याने घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवुन कन्हान नदी नवीन पुलाचे उद्घाटनाची वेळ मागीतली असता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नॅशनल हायवे आणि संबंधित विभागाच्या अधिकार्यांन सोबत चर्चा करुन पुलाचे उर्वरीत बांधकाम तात्काळ पुर्ण करण्याचे आदेश दिले व १ सप्टेंबर रोजी नवीन पुलाचे उद्घाटनाची वेळ दिल्याने परिसरात उत्साह चे वातावरण निर्माण झाले आहे. नवीन पुलाच्या उद्घाटना नंतर रेल्वे फाटक वारंवार बंद होणे , पुलावर लांबच लांब रांग लागण्याची परिस्थिती आणि इतर समस्यांपासून सर्वसामान्य प्रवाशांची सुटका होणार असल्याची माहिती रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी दिली आहे .
या प्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी , भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे, शहर अध्यक्ष डॉ.मनोहर पाठक , कांद्री शहरअध्यक्ष गुरुदेव चकोले, रिंकेश चावरे , शैलेश शेळके , शिवाजी चकोले , सुनील लाडेकर, पारस यादव , सुषमा मस्के , तुळजा नानवटकर, श्रावण वतेकर, कामेश्वर शर्मा, संजय रंगारी, मयूर मते, सौरभ पोटरे , हितेश साठवणे व इतर भाजपा सदस्य उपस्थित होते.