*आदर्श हायस्कुल कन्हान येथे दहीहंडी कार्यक्रम थाटात संपन्न*
*आदर्श हायस्कुल आणि आयडियल कां.हि.प्रा.शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान तारसा चौक येथील आदर्श हायस्कुल आणि आयडियल कां.हि.प्रा.शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या प्रांगणात दहीहंडी कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे सचिव भरत सावळे , आदर्श हायस्कुल च्या मुख्याध्यापिका चंद्रकला मेश्राम , प्रायमरी विभागा च्या मुख्याध्यापिका सुनिता देशमुख यांच्या हस्ते सरस्वती आणि भगवान श्रीकृष्ण प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी प्रायमरी विभागाच्या विद्यार्थांनी कृष्णांच्या वेशभुषेत एक नृत्य सादर केले . त्यानंतर दहीहंडी फोडुन व प्रसाद वाटप करुन दहीहंडी कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .
या प्रसंगी शिक्षक , शिक्षिका , विद्यार्थी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .