*कन्हान विकास प्राथमिक शाळा येथे स्व.राजीव गांधी यांना सद्भावना व दहीहंडी कार्यक्रम संपन्न*

*कन्हान विकास प्राथमिक शाळा येथे स्व.राजीव गांधी यांना सद्भावना व दहीहंडी कार्यक्रम संपन्न*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान विकास प्राथमिक शाळा येथे स्वर्गीय राजीव गांधी यांना सद्भावना व दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत व प्रमुख अतिथी नगरसेवक विनय यादव यांच्या हस्ते सरस्वती पूजन व स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . यावेळी मुलांनी कृष्णांच्या व राधाच्या वेशभूषेत एक नृत्य सादर केले व नंतर विद्यार्थ्यांकडून दहीहंडी फोडुन मिठाई वाटप करुन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .


या प्रसंगी शशिकांत बोंद्रे , शरद डोकरिमारे , देवेंद्र सिंह सेंगर , रविकांत गेडाम , अभिलाषा कावळे , ज्योती गोडे , सह आदि नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …