*कांद्री ग्रामपंचायत ला नगर पंचायत चा दर्जा मिळवुन देण्याची मागणी*
*भाजपा पदाधिकार्यांचे विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन*
*लवकरच कांद्री नगर पंचायत होईल – चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आश्वासन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – पारशिवनी तालुक्यातील कांद्री ग्रामपंचायतला नगर पंचायत चा दर्जा मिळवुन देण्याचा मागणी करिता भाजपा पदाधिकार्यांनी कोराडी येथील जनता दरबार मधे भाजपा प्रदेश अध्यक्ष व विधान परिषद सदस्य चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा करुन तसेच त्यांना एक निवेदन देऊन तात्काळ कांद्री ग्रामपंचायतला नगर पंचायत चा दर्जा मिळवुन देण्याची मागणी केली आहे .
पंचायत समिती पारशिवनी गट विकास अधिकारी यांचे पत्र क्र.न.प/५१५४/२०१५ पत्र दिनांक .१९ नोव्हेंबर २०१५ त्याच प्रमाणे जिल्हा परिषद नागपुर यांची स्थाई समिति सभा दि.१ जुलाई २०१६ ठराव क्र २ नुसार प्रभारी अधिकारी नगर परिषद प्रशासन शाखा नागपुर यांना ८ सप्टेंबर २०१६ ला पत्र व्यवहार करण्यात आला होता .त्या अनुशंगाने प्रधान सचिव महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय यांनी दी.१९ फेब्रुवारी २२ ला उपसचिव नगर विकास विभाग यांना दोन दिवसात कांद्री ग्राम पंचायत ला नगर पंचायत करण्याचा अहवाल मागितला होता . तेव्हा पासुन नगर पंचायतचा म्हणजेच 7 वर्षा पासुन कांद्रीला नगर पंचायत बनवीने हा प्रस्ताव मंत्रालय मध्ये प्रलंबित असून शासन , प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने भाजपा पदाधिकार्यांनी भाजपा ओबीसी आघाडी पारशिवनी तालुका अध्यक्ष नरेश पोटभरे यांच्या नेतृत्वात आणि भाजपा अनु:सुचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका अध्यक्ष लीलाधर बर्वे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कोराडी येथील जनता दरबार मधे भाजपा प्रदेश अध्यक्ष व विधान परिषद सदस्य चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा करुन तसेच त्यांना एक निवेदन देऊन तात्काळ कांद्री ग्रामपंचायतला नगर पंचायत चा दर्जा मिळवुन देण्याची मागणी केली आहे .
*चंद्रशेखर बावनकुळेंनी तात्काळ घेतली दखल , लवकरच कांद्री नगर पंचायत होईल असे दिले आश्वासन*
भाजपा पदाधिकार्यांनी कांद्री ग्रामपंचायतला नगर पंचायत चा दर्जा मिळवुन देण्याचे पत्र दिल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांना कांद्री ग्रामपंचायत ला नगर पंचायत करण्याबाबत चे पत्र तयार केले असुन पदाधिकार्यांना लवकरच कांद्री ग्रामपंचायत चे रुपांतर नगर पंचायत होईल असे आश्वासन दिले .
या प्रसंगी जयराम मेहरकुळे , रिंकेश चवरे , शैलेश शेळके , मयूर माटे , विशाल पोटभरे , शिवाजी चकोले , गुरुदेव चकोले , मारोतराव कुंभलकर , राहुल वंजारी , किरण ठाकुर , रजत गजभिये , सागर पोटभरे , लावण्य पोटभरे , विक्रांत भटेरो सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .