*शेतकरी आणि गावकऱ्यांना राख तलाव व कोळसा धुळ प्रदुर्शनापासुन पुर्णत: मुक्त करणार – मा आदित्य ठाकरे*
*खापरखेडा ची राख व कोळसा खदान , कोलवासरी च्या धुळ प्रदुर्षन बंद करिता शेतकर्यांनी दिले निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा येथील राख विसर्जन करण्याकरिता नांदगाव-बखारी शेत शिवारात पेंच नदीच्या अगदी जवळ राख तलाव असुन या राखे मुळे नांदगाव गावकऱ्यांच्या व शेतकर्यांच्या जनजीवनावर वाईट परिणाम होत , योग्य मोहबदला न देता भंयकर समस्या निर्माण झाल्याने तत्काळीन पर्यावरण मंत्री मा.आदित्य ठाकरे हयानी तलावा मध्ये राख सोडणे कायमस्वरूपी बंद करून तलावातील ७०% राख बाहेर काढण्यात आली असुन मुळ समस्या सोडवुन नांदगाव च्या ग्रामस्थ व शेतकर्यांना पुर्णत: न्याय मिळवुन देण्याकरिता मी कटिबंध्य असुन सोबत असल्याचे युवासेना प्रमुख मा.आदित्य ठाकरे साहेब हयानी आपल्या भेटी दरम्यान ग्रामस्थाना संबोधित करतांनी हमी दिली .
शनिवार (दि.२७) ऑगस्ट २०२२ ला विदर्भातील शेतकर्यांच्या अत्यंत महत्वाच्या पोळा सणाच्या पाळव्याला युवा सम्राट , युवासेना प्रमुख मा आदित्य ठाकरे साहेबांनी दुपारी ३.१० ला नांदगाव येथे भेट देऊन ग्रामस्थ , शेतकर्यांच्या व्यथा ऐकुन घेत सुसंवाद साधला. या प्रसंगी शिवसेना रामटेक माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव , शिवसेना संपर्क प्रमुख सुधिर सुर्यवंशी, जिल्हा प्रमुख (ग्रा) राजु हरणे , उत्तम कापसे , युवासेना जिल्हा प्रमुख शुभम नवले , रामटेक विधानसभा संघटक प्रेम रोडेकर सह शिवसेना , युवासेना पदाधिकारी , संभाजी ब्रिगेड नागपुर जिल्हा (ग्रा) अध्यक्ष संजय कानतोडे , शांताराम जळते , रविंद्र ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या राख तलावाची राख पेंच नदीत सोडुन सरळ नदी प्रदुर्शित करून नांदगाव च्या नागरिकांचे व शेतकर्यांच्या जनजीवनावर वाईट परिणाम होत , योग्य मोबदला न देता भंयकर समस्या निर्माण केल्याच्या वारंवार तक्रारी प्राप्त झाल्याने मी पर्यावरण मंत्री असतांना (दि.१३) फेब्रुवारी नांदगाव राख तलावाची पाहणी करून वस्तु स्थिती खरच भयानक असल्याने राख तलाव त्वरित बंद करून तलावातील राख बाहेर काढुन प्रकल्प ग्रस्ताच्या व नागरिक, शेतकर्यांच्या संपुर्ण समस्या सोडविण्याचे संबधित अधिकार्यांना आदेश दिले होते. राख तलाव बंद करून त्यातील राख सुध्दा ७०% काढण्यात आली आहे. परंतु ग्रामस्थ , प्रकल्पग्रस्थ शेतकर्यांच्या इतर समस्याही सोडवुन पुर्णत: न्याय मिळवुन देण्याकरिता मी कटिबंध्य असुन आपल्या सोबत असल्याचे युवासेना प्रमुख मा. आदित्य ठाकरे साहेब हयानी आपल्या भेटीत ग्रामस्थाना संबोधित करतांनी हमी दिली. तसेच परती ला कोळसा खदान चे व गुप्ता कोल वासरीच्या कोळसा धुळीने वराडा , एंसबा च्या त्रस्त शेतकऱ्यांच्या निवेदना ने कोल वासरी व बाजुच्या शेतीला धावती भेट दिली. या सुसंवाद कार्यक्रमात नांदगाव सरपंचा सोनाली मनोज वरखडे , उपसरपंच सेवक कृष्णाजी ठाकरे , देवाजी ठाकरे , वराडा सरपंचा विद्याताई दिलीप चिखले , क्रिष्णा खिळेकर , रामभाऊ ठाकरे , धर्मेंद्र रच्छोरे , अजयसिंह राजगिर्हे , रवि रच्छोरे, वनदेव वडे , किशोर ठाकरे , जागेश्वर पुर्हे , गेंदलाल रच्छोरे , संतोष उपाध्ये , निलेश गिरी , देवचंद चव्हाण , तुषार ठाकरे , दशरथ गिरी , रामकृष्ण शिंदेमेश्राम , आकाश ठाकरे , ललीत धानोले , राज ठाकरे , तेजराम खिळेकर , गोरले , लताबाई ठाकरे , माया पुर्हे , ज्योती ठाकरे , विजया वडे , अश्विनी ठाकरे सह नांदगाव, एंसबा, वराडा परिसरातील प्रकल्प ग्रस्त ग्रामस्थ , शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.