*मुक बधिर शाळेत तान्हा पोळा उत्साहात साजरा*
सावनेरः देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून बैलपोळा सणाच्या पूर्वसंध्येला संस्था मार्गदर्शनाखाली मूक बधिर निवासी शाळा सावनेर येथे मोठ्या प्रमाणात तान्हा पोळा साजरा करण्यात आला.
या पोळ्यात शाळेतील मूक बधिर बालकांसोबत शाळा परिसरातील सर्व सामान्य बालकांनी सहभाग घेतला.पोळ्यात एकूण ७५ बैलांची पूजा करण्याचा मानस यावेळी पूर्ण झाला.पोळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे सावनेर शहरातील पाच फूट उंचीचा लाकडी बैल संस्थेने पोळयासाठी शाळेत उपलब्ध करून दिला.विविध वेशभूषेत स्वतः सजविलेल्या बैलांना पोळ्यात मिरविताना बालकाचा उत्साह दांडगा होता.या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक,परिसरातील नागरिक,उपस्थित होते. “अन्नक्षेत्र”संस्थेतर्फे बालकांना मोठ्याप्रमाणात खाऊचे वाटप करण्यात आले.*