*नागपुर – जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वर डुमरी शिवारात दोन ट्रकात भीषण अपघात , एकाचा मृत्यु*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील बालाजी सेलीब्रेशन हॉल डुमरी शिवारात एका कंटेनर ट्रक ने रोडा वर उभा असलेल्या कोळसा च्या ट्रक ला मागुन जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कंटेनर ट्रक चालकाचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला कोळसा च्या ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सरकार तर्फे फिर्यादी पोलीस नापोशि प्रशांत परमेश्वर रंगारी हे रविवार दिनांक २८ आॅगस्ट ला पोलीस हवालदार प्रशातं रामटेके यांचे सोबत नाईट ऑफिसर मदतनीस म्हणुन ड्युटी करीत असतांना रात्री ११:३० वाजता च्या दरम्यान पोस्टे एम.डी.टी डायल ११२ वर टोल नाका कन्हान येथील कर्मचारी राहुल मनगटे यांनी कॉल करून सांगीतले की , बालाजी सेलीब्रेशन हायवे रोड डुमरी शिवार येथे अपघात झालेला आहे . अशा माहीती वरुन नापोशि प्रशांत रंगारी हे आपल्या स्टाफँसह सदर घटनास्थळी पोहचले असता तेथे घटनास्थळाची बारकाईने पाहनी केली असता तेथे ट्रक क्रमांक एम एच ३४ ए बी २४४९ हा नादूरुस्त स्थितीत उभा दिसला असुन त्याचे ट्रक चालका ने सुरक्षीतते चे कोणतेही चिन्ह व रिफ्लेक्टर न लावता आपले वाहन हायवे रोडवर उभे केले असता नागपूर वरुन मनसर कडे जाणारा ट्रक कंटेनर क्रमांक एच.आर. ३८ / झेड- २२३४ चा चालकाला रोडा वर उभा असलेला ट्रक एम एच ३४ ए बी २४४९ चे कोणतेही सुरक्षा चिन्ह न दिसल्याने मागून येऊन जोरदार धडक दिल्याने चालक हा गंभीरपणे जख्मी होउन मरण पावला दिसल्याने पोलीसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे रेफर करण्यात आले .
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी प्रशांत रंगारी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला ट्रक क्रमांक एम एच ३४ ए बी २४४९ च्या चालका विरुद्ध अपराध क्रमांक ५०५/२२ कलम २८३,३०४ ( अ ) भादवी अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार प्रशांत रामटेके हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .