*सावनेर येथे विमा प्रतिनिधी चे असहकार आंदोलन*

*सावनेर येथे विमा प्रतिनिधी चे असहकार आंदोलन*


सावनेर –ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया लियाफी या संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी केंद्र सरकार व एल आय सी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज LIC च्या स्थापना दिनी गुरुवार ला विमा प्रतिनिधींनी येथील एल आय सी कार्यालयासमोर देशव्यापी असहकार आंदोलन सुरु केले. संपूर्ण देशात आज लियाफी या अभिकर्त्यांच्या संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आज LIC च्या स्थापना दिनापासून देशव्यापी असहकार आंदोलन पुकारण्यात आले आहे.
त्याच आंदोलनाला यशस्वी करण्याच्या हेतूने येथील लियाफी संघटनेचे अध्यक्ष धनराज निकोसे यांच्या मार्गदर्शनाखाली एल आय सी कार्यालयासमोर शेकडो अभिकर्त्यांनी असहकार आंदोलन सुरु केले.
या आंदोलनात सहभागी होऊन यशस्वी करण्यासाठी सकाळी १० वाजता पासूनच विमा अभिकर्त्यांनी स्वेच्छेने कार्यालयाबाहेर गर्दी केली होती.
तीन महिने हे असहकार आंदोलन संपूर्ण देशभर विविध चरणांमध्ये असेच चालणार असून येथील एल आय सी कार्यालयात विमा प्रतिनिधी च्या आंदोलनामुळे एकही नवीन विमा पॉलिसी काढली गेली नाही.


विमा प्रतिनिधींच्या विविध मागण्यांसाठी व होत असलेल्या आंदोलना संदर्भात येथील शाखा व्यवस्थापक किशोर सहारे यांना लियाफी संघटनेचे अध्यक्ष व विमा प्रतिनिधीनी तर्फे या पुकारलेल्या देशव्यापी असहकार आंदोलनाचे माहितीपत्र असलेले निवेदन देण्यात आले.

विमा पॉलिसीवरील gst बंद व्हावा, पॉलिसी कर्जावरील व्याज कमी व्हावे, एल आय सी चे खाजगीकरण होऊ नये, विमा पॉलिसी ची ऑनलाईन विक्री बंद करावी, विमा प्रतिनिधी च्या ग्रॅच्युटी मध्ये वाढ व्हावी, प्रतिनिधींच्या आरोग्य विम्यात वाढ व्हावी. अश्या विविध मागण्या विमा प्रतिनिधी व लियाफी संघटनेच्या आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …