कलमेश्वर -लिंगा 5 वर्षीय चिमुकली हत्याकांड-*नराधम संजय पुरी होता पळण्याच्या प्रयत्नात..*

*नराधम संजय पुरी होता पळण्याच्या प्रयत्नात..*

*असा आला गुन्हा उघडकीस*

*गुन्हा उघडकीस आणणे याकरीता स्वान पथकाची झाली मदत*

*आयुक्तालयाकडे आर्थिक मदतीची मागणी*

*विशेष प्रतिनिधी सतीश नांदे कळमेश्वर*

दिनांक 6 डिसेंबर रोजी कळमेश्वर तालुक्यातील लिंगा या गावांमध्ये पाच वर्षीय कुमारी नीलम शांताराम भलावी ही बेपत्ता झाल्याची तक्रार कळमेश्वर पोलिसांकडे नोंद करण्यात आली होती तिचा शोध घेत असताना तिसऱ्या दिवशी तिचा मृतदेह मृतक नीलम हिचा राहत्या घरासमोरच असलेल्या संजय भारती राहणार नागपूर यांच्या शेतामध्ये असलेल्या तुरीत आढळून आला याठिकाणी तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केल्याचे स्पष्ट करण्यात आले होते या दुर्दैवी घटनेचा निषेध करीत संपूर्ण कळमेश्वर शहर आणि तालुका वासियांनी कळमेश्वर शहर बंद ठेवले होते मोठे आंदोलनही कळमेश्वर ब्राह्मणी शहरात करण्यात आले होते. चीड आणणार्‍या या घटनेबाबत सर्व स्तरातून निषेध करण्यात येत असल्याने प्रशासनावरही दबाव निर्माण झाला होता यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हा चर्चेचा विषय निर्माण होऊन प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या गोष्टीची दखल घ्यावी लागली होती अवघ्या काही तासातच दिनांक आठ रोजी आरोपी संजय पुरी या नराधमाला कळमेश्वर पोलिसांनी बेड्या ठोकत अटक केली. ाळीमा फासणाऱ्या या घटनेचा तपास कळमेश्‍वर पोलिसांसाठी चालेंज ठरला होता. या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याचे तपासात उघड झाले.
असा लागला शोध…
लाईट असतानासुद्धा शेताला पाणी न दिल्याने बळावला नराधम संजय वर पोलिसांचा संशय
सध्या तालुक्यात असलेले लोडशेडींग बघता शेतकरी शेत पिकाला पाणी देण्यासाठी हैराण झालेले आहेत आठवड्यातून तीन दिवस दिवसा आणि चार दिवस रात्री लोडशेडिंगचा टाईम टेबल ठरलेला आहे उभ्या पिकाला पाणी देण्यासाठी एक दिवस महत्त्वाचा असताना घटनेच्या दिवसापर्यंत शेताला सतत पाणी देणारा आरोपी नराधम संजयने दिनांक ६ डिसेंबर रोजी पर्यंत शेतातील पिकाला पाणी दिले याच दिवशी सायंकाळी ६ वाजता दरम्यान रस्त्याने एकटी येत असलेल्या मृतक नीलमला हेरून शेतातील तुरीच्या मध्यभागी नेऊन अत्याचार करून तिचा निर्दयतेने खून केला व जणू काही केलेच नाही अशा अविर्भावात वावरत त्याने गुन्हा केल्यानंतर गावातीलच बस स्थानक परिसरात दारू पिऊन घरी गेला घरी गेल्यानंतर शेजारी कडे जाऊन टीव्ही बघितली आणि पुन्हा दारू पिऊन जेवण करून तो घरीच झोपला. दुसरे दिवशी शेतामध्ये येऊन शेत मालकाच्या इतर शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांना दुसऱ्या शेतात नेऊन सोडले. त्यानंतर सतत पाणी ओलणाऱ्या आरोपी संजयने दिवसा लाईट असूनसुद्धा आणि दररोजच्या अर्धवट पाणी ओलणे झाले असल्यावर सुद्धा दिवसभर शेतात त्याने पाणी न ओलता केलेल्या गुन्ह्याचा गुन्हा उघडकीस येतो की नाही असा अंदाज गावकऱ्यांकडून घेत राहिला. यावेळी त्याच्यावर कुठलेही टेन्शन दिसून येत नव्हते. दुसरे दिवशी गावकर्यां सोबत तोही मुलीचा शोध घेऊ लागला मात्र घटनास्थळावर पोलीस अधिकारी आल्याने त्याने घरीच राहणे पसंत केले तो घटनास्थळावर आला नाही .नेमके तपासासाठी आणलेल्या श्वानानेही त्यांनी केलेल्या गंभीर गुन्ह्याचा अंदाज घेत एक पावली रस्त्यावरून सरळ त्याचे राहते घर गाठले. आणि श्वानमागे गेलेल्या पोलिसांनी आरोपी संजय ला अटक करून सरळ पोलीस स्टेशनला घेऊन गेले सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा आरोपी संजय पोलिसी खाक्या आणि मार बसताच पोपटासारखा बोलू लागला आणि याच वेळी त्याने अत्याचार करून खून केल्याची कबुली दिली. शेती कामामध्ये वापरण्यात आलेले पावडे लाईट असतानासुद्धा पिकाला पाणी न देणे सर्व गावकरी घटनास्थळावर जमा होऊन सुद्धा आरोपीने घरीच राहणे आणि आणि त्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली त्यात शेतामध्ये आरोपी संजय घटनेच्या दिवशीपर्यंत असणे या चार मुख्य कारण वरून आरोपी नराधम संजय वर संशयाची सुई वळली. याच कारणावरून हागुन्हा उघडकीस आला आहे.
आरोपी नराधम संजय होता पळण्याच्या तयारीत…
घटनेच्या दिवसापासून जणूकाही ही घडलेच नाही या अविर्भावात वावरत असताना संधीचा शोध घेऊन आरोपी पोलिसांची दिशाभूल होण्याची वाट बघत होता आणि हीच संधी साधून आरोपी पळण्याच्या तयारीत होता त्यासाठी त्याने कपड्याची पिशवी सुद्धा भरून ठेवल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

याअगोदरही संजयने केले होते असेच कृत्य..
तालुक्यातील मोहगाव सावंगी या गावात तीन वर्षे अगोदर राहत असताना नात्यातील एका मुली सोबतच त्याने असा प्रकार केल्याची विश्‍वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली असून हे प्रकरण मध्यस्थी होऊन मिटवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आरोपी नराधम संजय मुळे मोठा भाऊ आणि वहिनी ला रातोरात सोडावे लागले घर..
आरोपी हा सतत दारू पीत असल्याने त्याचा मोठा भाऊ आणि घरातील कुटुंबीय सतत तणावात राहत होते एकाच घरी राहत असताना सुद्धा ते वेगवेगळे राहायचे आरोपीस संजयने केलेल्य या दुर्दैवी प्रकरणामुळे ावकर्‍यांचा रोष अनावर होत गावकऱ्यांनी संजय राहत असलेले घर पेटवून द्यावे असा सूर काढला होता मात्र प्रकरण वाढत असल्याचे बघून रातोरात संजय चा भाऊ आणि वहिनी यांना घर सोडून इतरत्र जावे लागले विशेष.क्षक्ष
मृतक नीलम भलावी च्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या: सामाजिक कार्यकर्ते किशोर मोहोड यांची आदिवासी आयुक्तालयाकडे मागणी
मृतक नीलम भलावी या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असल्याने तिच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी घर आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आदिवासी आयुक्तालयाकडे लिंगा येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर मोहोड यांनी आदिवासी आयुक्तालय नागपूर यांच्याकडे केली आहे याबाबतचे निवेदनही त्यांना देण्यात आली असून यावेळी त्यांच्यासोबत ग्रामपंचायत लिंगाचे उपसरपंच दीपक पाल माजी सरपंच सुभाष किरपाल एडवोकेट राहुल मोहोड मनोहर पाल यांच्यासह गावकर्‍यांची उपस्थिती होती.
माहिती न करता ठेवले सालदार
या झालेल्या लिंगा या गावातील हत्याकांडातील आरोपी संजय पुरी याची कोणतीच माहिती घेता,तसेच हा कुठून आला,त्यावर कोणते गुन्हे आहे तो काय करत होता त्याची कुठल्याही प्रकारे चौकशी न करता संजय भारती या नागपूर येथील शेती मालकाने त्याला कमी पैशात सालदार म्हणून ठेवले त्यामुळे हा हत्याकांड संजय भारती हासुद्धा तितकाच गुन्हेगार आहे असे नागरिकांकडून बोलले जात आहे.
नापिकी व हतबल झालेल्या शेतकऱ्याची जमीन अल्पदरात मिळत असल्याने कळमेश्वर तालुक्यातील लिंगा,तेलगाव,नांदिखेडा,मोहगाव,उबाळी,उपरवाही,सोनेगाव,दहेगाव व इतर गावातील शेतकऱ्याच्या शेती नागपूर येथील धनाढ्य लोकांनी घेतल्या व या शेतीवर ते सालदार ठेवून उत्पादन घेऊ लागले पण सालदार ठेवताना कोणतेच निकष त्यांनी पाडले नाही व ते आपल्या शेतात फक्त रविवार व शनिवार या दिवशी मध्यप्राशन व मौज मस्ती करण्यासाठी येत असतात त्यामुळे या जिल्ह्यात अशा प्रकारच्या अत्याचार च्या घटना होत असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेस कोण जबाबदार? सदर घटनेला आळा घालण्यासाठी महसूल विभागातर्फे तहसीलदार उपविभागीय अधिकारी,पोलीस प्रशासन यांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …