*काटोल येथे विदर्भातील उत्कृष्ट सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न*
*शिक्षक आमदार नागो गाणार यांचा पेन्शनच्या विसंगतीवर प्रहार*
काटोल प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
काटोल- काटोल येथील जेष्ठ नागरिक सेवा मंडळच्या वतीने स्वर्गीय चंपतराव बुटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ शनिवारला शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील प्रशंसनीय जनसेवेच्या गौरवार्थ पुरस्कार प्रदान करण्यात येतो यावर्षी विदर्भातून गडचिरोली वर्धा चंद्रपूर गोंदिया नागपूर भंडारा यासह इतर जिल्ह्यातून वीस उत्कृष्ट सेवानिवृत्त शिक्षकांचा मानपत्र व शाल श्रीफळ देऊन शिक्षक आमदार नागो गाणार व काटोल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चरण सिंग ठाकूर तसेच काटोलचे गटशिक्षणाधिकारी सोनटक्के लखोटिया भुतडा हायस्कूलचे प्राचार्य शंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार समारंभ थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळाचे सचिव गजानन भोयर यांनी केले तर कार्यक्रमाला उद्घाटनिय भाषणात शिक्षक आमदार नागो गाणार यांनी माणसाचा चेहरा घडवणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षकांचा वैद्यकीय खर्च शासनाने केला पाहिजे वैद्यकीय क्षेत्रात लूट सुरू आहे भ्रष्टाचार आहे याचे दुःख व्यक्त केले. एक नोव्हेंबर 2005 नंतरच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचारी यांना पेन्शन मिळाली पाहिजे शिक्षक हा विद्यार्थ्यांना आपलीच मुले आहे असे समजून त्याला घडवत असतो . आजच्या युवा पिढीच्या वागण्यावर चिंता व्यक्त करून ते बदलले पाहिजे यावर उपाययोजना केली पाहिजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर वक्तव्य करून देशातील सांस्कृतिक धोरणावर त्यांनी प्रकाश टाकला शिक्षणातून सेवा करणारे नेते तयार झाले पाहिजे समाजात नवजागृती झाल्याशिवाय अनिष्ट प्रथा परंपरा नियंत्रित होऊ शकत नाही त्यासाठी मतदारांनी जागृत होऊन आपला नेता निवडला पाहिजे प्रसंगी त्यांनी मतदार जाती धर्माच्या नावावर बदलतो याचेही दुःख व्यक्त केले व हा कार्यक्रम जेष्ठ नागरिकांनी घडून आणला त्याबद्दल त्यांनी जेष्ठ नागरिक मंडळ यांचे आभार व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समिती काटोलचे सभापती चरण सिंग ठाकूर यांनी आजची पिढी वडिलांच्या अंतिम संस्कार लाही उपस्थित राहू शकत नाही याबद्दल दुःख व्यक्त करत आजच्या पिढीला योग्य संस्काराची गरज असून ती मिळत नाही , मिळाली तर अमलात येत नाही यावर प्रकाश टाकला तद्वताच त्यांनी आपल्या भाषणात आमदार नागो गाणार यांचे कौतुक करताना चाळीस वर्षात असा आमदारच पाहिला नाही इतके महान कार्य शिक्षक आमदार म्हणून करीत आहे. पराड गुरुजी यांनी स्वर्गीय चंपतराव बुटे यांच्या कार्यावर प्रकाश टाकीत कोंढाळी येथील शाळेत बुटे गुरुजींनी विद्यार्थी कसे घडवले याचे विविध उदाहरणे देऊन श्रोत्यांसमोर आदर्श निर्माण केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन भोयर तर सूत्रसंचालन हरीश राठी, वनिता राऊत तसेच आभार प्रदर्शन झांबरे गुरुजी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरा फाउंडेशन, अरविंद सहकारी बँक काटोल तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळ काटोलचे अध्यक्ष रमेश तिजारे पत्रकार सुधीर बुटे राजेंद्र खामकर दिलीप वरोकर शालेय विद्यार्थिनी, माधवबाग हॉस्पिटल आदींनी परिश्रम घेतले.