*ब्रेकिंग न्यूज़*
*परिसरातील बोर्डा रोड वरील भारत पेट्रोलपंप समोर कल्पेश बावनकुळे नामक इसमाची दोन युवकाने धारदार शस्त्राने केली हत्या*
परिसरात खळबळ , आरोपी पसार , आला अधिकारी घटनास्थळी दाखल , आरोपीचा शोध सुरु
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान परिसरातील बोर्डा रोड वरील भारत पेट्रोलपंप समोर कल्पेश बावनकुळे नामक इसमाची दोन अनोळखी इसमाने धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे .
सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार आज रविवार दिनांक ११ सप्टेंबर ला रात्री १२:०० ते १:०० वाजता च्या दरम्यान मृतक कल्पेश भगवान बावनकुळे वय २८ वर्ष राहणार बनपुरी हा आपल्या दुचाकी अॅक्टीवा क्रमांक एम एच ४९ बीएल ५६२८ वाहनाने नागपुर वरुन डी जे चा आॅडर पुर्ण करुन त्याचे मित्र १) सुरज ढोबळे २) जीतेंद्र ढोबळे यांचा सोबत बोर्डा रोड ने बनपुरी गावा कडे जात असतांना भारत पेट्रोलपंप समोर दोन अनोळखी इसम आडवे आल्याने मृतक कल्पेश बावनकुळे याने गाडी थांबविली असता मृतक व त्याचे मित्र खाली पडल्याने आरोपीतांनी
मृतक व त्याचे मित्राला काही न विचारता मारायला धावल्याने मृतक कल्पेश बावनकुळे व त्याचे मित्रांनी अॅक्टीवा वाहन सोडुन पेट्रोल पंप च्या दिशेने पळाले असता आरोपीतांनी कल्पेश बावनकुळे यांला पकडुन त्यांचावर शरीरा वर धारदार शस्त्राने सपासप वार करुन हत्या केली .
सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे , सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम , नरेश वरखडे , कोमल खैरे , जितु गावंडे आदि कर्मचाऱ्यानी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले आहे .
सदर घटना गंभीर्याने लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान , स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे , सह आदि अधिकार्यांनी घटनास्थळी पोहचुन पाहणी करुन आरोपी शोधकामी पोलीस पथक तयार करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे .