*”गणपती बाप्पा मोरया….पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात बप्पाचे विसर्जन* *कन्हान पोलीस विभाग , नगर परिषद प्रशासन यांचा कडक बंदोबस्तात बप्पाला निरोप* *विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ छेरींग दोरजे यांनी दिली भेट*

*”गणपती बाप्पा मोरया….पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात बप्पाचे विसर्जन*

*कन्हान पोलीस विभाग , नगर परिषद प्रशासन यांचा कडक बंदोबस्तात बप्पाला निरोप*

*विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ छेरींग दोरजे यांनी दिली भेट*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – शहरात आणि ग्रामीण भागात गणेश चतुर्थी च्या दिवशी थाटा मटात गणेश मुर्तीची स्थापना करुन सतत दहा दिवस विधिवत पुजा अर्चना , खेळ , संस्कृति कार्यक्रम , भजन कीर्तन करुन अनंत चतुर्दशी च्या दिवशी “गणपती बाप्पा मोरया….पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात पुरातन काली माता मंदिर कन्हान घाटावर बप्पाचे विसर्जन करुन परिसरात गणेश महोत्सव मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला .


बुधवार ३१ आॅगस्ट ला गणेश चतुर्थी च्या दिवशी कन्हान शहर आणि ग्रामीण भागातील ३० गाव पैकी सार्वजनिक गणेश मंडळ मध्ये कन्हान शहरात ४ , ग्रामीण भागात १६ असे एकुण २० ठिकाणी आणि घरगुती ७५० ठिकाणी श्री गणेश मुर्तीची विधिवत पूजा अर्चना करून स्थापना करण्यात आली असुन सतत दहा दिवस मंडळात आणि घरोघरी गणेश जी ची सकाळ , सायंकाळ विधिवत पूजा अर्चना करून आरती करण्यात आली असुन भजन कीर्तन करण्यात आले होते . या गणेश महोत्सवात दहा दिवस सार्वजनिक गणेश मंडळात , विविध खेळ , संस्कृति स्पर्धा , भजन कीर्तन करुन आणि नऊ व्या दिवशी महाप्रसाद वितरण करण्यात आले .


शुक्रवार दिनांक ९ सप्टेंबर ला अनंत चतुर्दशी च्या दिवशी “गणपती बाप्पा मोरया….पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात पुरातन काली माता मंदिर कन्हान घाटावर बप्पाचे विसर्जन करुन परिसरात गणेश महोत्सव मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला .

*कन्हान पोलीस विभाग , नगर परिषद प्रशासन यांचा कडक बंदोबस्तात बप्पाला निरोप*

 

अनंत चतुर्दशी लक्षात घेत
कन्हान नदी काठावरील काली माता मंदीर विसर्जन घाटावर कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासना द्वारे प्रतिबंधक नियम पालन करण्याकरिता घाटावर कटघरे, विद्युत, स्वयंसेवक, माहिती व मदत कक्षासह इतर विविध व्यवस्था करण्यात आली होती .
कन्हान पोलीस विभागा द्वारे नदी काठावर पोलीसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असुन विसर्जन स्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब, नागपूर परिक्षेत्र ,नागपुर डॉ.छेरींग दोरजे यांनी भेट देऊन पाहणी केली असुन पोलीस उप अधिक्षक गृह संजय पुरंदरे , कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे , विजय माहुलकर पो.नि.वा.नि.शा. हे प्रामुख्याने उपस्थित होते . पोलीस मुख्यालयातून पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी , वाहतुक कर्मचारी यांना अतिरिक्त तुकडी मागवण्यात आले होते. 
कन्हान पोलीस विभाग आणि नगर परिषद प्रशासन यांचा कडक बंदोबस्तात ढिवर समाज सेवा संघटना जिवन रक्षक पथकाने कन्हान शहर व ग्रामिण परिरातील श्री गणेश मुर्तीचे नदी पात्रात विसर्जन करण्यात आले .

*ढिवर समाज सेवा संघटनेचे जिवन रक्षक पथकास पोलीस विभागा तर्फे टी शर्ट देऊन सन्मान*

या वर्षी पेंच व तोतलाडोह धरणे भरून असल्याने दोन्ही धरणाचे दरवाजे उघडुन धरणातील पाण्याचा विसर्ग नदीत होत असल्याने कन्हान नदी पात्रात पुरपरिस्थीती लक्षात घेता नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर , उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी , तालुका तहसीलदार प्रशांत सागंडे , पोलीस उपविभागीय अधिकारी मुख्तार बागवान , थानेदार विलास काळे , मुख्य अधिकारी , मंडळ अधिकारी , तलाठी यांनी सुव्यवस्था व कडक पोलीस बंदोबस्तात श्री मुर्तीचे सुखरूप विसर्जन करण्याकरीता ढिवर समाज सेवा संघटनेचे जिवन रक्षक पथकास पोलीस विभागा तर्फे टी शर्ट देऊन सन्मान करण्यात आला . श्री गणेश विसर्जन स्थळी ग्रामीण पोलीस अधिक्षक विजय कुमार मगर,अप्पर पो.अधिक्षक राहुल माखणीकर , गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे , नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर , नगरसेवक व नगरसेविका आदीने भेट दिली.
विसर्जन यशस्वीतेत करिता महसुल विभाग , पोलिस विभाग , नगरपरिषद कर्मचारी , पोलीस अधिकारी व कर्मचारी , होम गार्ड , ढिवर समाज सेवा संघटना कन्हान चे अध्यक्ष सुतेश मारबते यांनी आपली टिम सह भावीभक्ताचे  सहकार्य केले. 

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …