*सलमान कर्तुत्वाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न*
*विदर्भातील 20 आदर्श से.नि.शिक्षकांचा सत्कार*
काटोल- स्व. प्राचार्य चंपतराव बुटे सर यांच्या पुण्यस्मरणार्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ काटोल द्वारा दिनांक 10 सप्टेंबर 2022 ला मंडळाच्या विरंगुळा केंद्रात विदर्भातील निवड केलेल्या 20 आदर्श सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभ मोठ्या थाटात पार पडला.
कार्यक्रमासाठी उद्घाटक शिक्षक आमदार मा. श्री नागो गाणार तर अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती काटोल चे सभापती तथा मंडळाचे हितचिंतक श्री चरणसिंग ठाकूर, तर प्रमुख अतिथी म्हणून काटोलचे गटशिक्षणाधिकारी श्री संतोष सोनटक्के, प्राचार्य श्री गणेश शेंबेकर त्याशिवाय मंडळाचे अध्यक्ष रमेशजी तिजारे, उपाध्यक्ष श्री शामरावजी झामडे , सचिव तथा कार्यक्रमाचे संयोजक गजाननराव भोयर ,वरिष्ठ मार्गदर्शिका श्रीमती निर्मलाताई कोंडे , नियोजक श्री सुधीर बुटे मंचावर उपस्थित होते.
निमंत्रित सत्कारमूर्ती प्राचार्य संजय ठावरी कोरपना- चंद्रपूर, डॉ.वाल्मीक इंगोले यवतमाळ,संजय वानखेडे वर्धा, जयंत उपाध्ये भंडारा, एकनाथ येळणे गोंदिया , वसंत राऊत गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील सौ. पुष्पा पालीवाल पाराशिवणी, प्रा. मीनल येवले कुही, प्रभाकर लांजेवार उमरेड ,वामनराव मोहतुरे मौदा, सुरेश भणारे कामठी, बहादुर वानखेडे रामटेक, अशोक दुबे सावनेर , प्रा. शरदराव मेंघळ नरखेड, त्र्यंबक भडके हिंगणा, अरविंद पांडे वाडी, विनोद राऊत नागपूर, प्रा. भास्कर पराड कोंढाळी, घनश्याम पुंड व दीपक सावळकर काटोल यांना सन्मानचिन्ह, मानपत्र शाल-बुके देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
सेवेत असताना व त्यानंतर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करणाऱ्या मंडळीची दखल घेऊन ज्येष्ठ नागरिक मंडळ काटोल द्वारा मागील तेरा वर्षापासून *सन्मान कर्तुत्वाचा” पुरस्काराचे वितरण कार्य हाती घेतल्याने कृतीशील शिक्षकांना प्रेरणा मिळत असल्याचे तसेच मंडळाचे हे कार्य प्रशंसनीय असल्याचे उद्घाटनपर भाषणातून आमदार महोदय श्री नागो गाणार यांनी सांगितले. तसेच आजची पिढी कौटुंबिक जबाबदारीतून भरकटत आहे, त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे,परंतु अनुभव असा येतो की याबाबत केलेल्या मार्गदर्शनाचे अनुकरण आजच्या पिढीकडून होताना दिसत नाही, हे खेदाची बाब आहे. असे उद्गार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चरणसिंग ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
उपस्थित 21 ज्येष्ठांना भेटवस्तू देऊन त्यांचा सामूहिक वाढदिवस मंडळाद्वारे साजरा करण्यात आला व त्यांना उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्यात. मंडळाचे सचिव तथा कार्यक्रमाचे संयोजक श्री गजाननराव भोयर यांनी प्रास्ताविक केले. तर संचालन श्री हरीश राठी, सौ वनिताताई राऊत यांनी केले आभार प्रदर्शनाचे कार्य उपाध्यक्ष श्री झामडे सर यांनी पार पाडले.मंडळाचे अध्यक्ष श्री रमेशजी तिजारे यांचे सौजन्याने उपस्थिताना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात “खरा तो एकची धर्म ” या समूहगीताने तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.प्रख्यात माधवबाग हॉस्पिटल कोंढाळी कडून उपस्थिताची निःशुल्क आरोग्य तपासनी व तज्ञ डॉक्टरचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संचालक मोतीरामजी वंजारी, हितेंद्र गोमासे, रामदास कळंबे, श्रीमती दुर्गाताई कडू, कोषाध्यक्ष रुपराव राऊत, श्री सुरेश येवले यांचे सहकार्य लाभले तर दीपक सावळकर यांचे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात विशेष सहकार्य मिळाले असल्याचे संयोजक श्री गजाननराव भोयर यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी 175 सन्माननीय मंडळीची उपस्थिती लाभली.