*आरोपींचा शोध लावून मृतका च्या परिवाराला तात्काळ योग्य न्याय देण्याची मागणी*
*परिसरात कायदा सुव्यवस्था कडक करुन मोठ्या प्रमाणात सुरु असलेले अवैध धंधे बंद करा*
*भाजपा पदाधिकार्यांचे व संतापलेल्या नागरिकांचे पोलीस निरिक्षकांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान परिसरातील बोर्डा रोड वर दोन अज्ञात आरोपी ने धारदार शस्त्राने वार करुन कल्पेश बावनकुळे याची निघृण हत्या केल्याने संपुर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने भाजपा पदाधिकार्यांनी व संतापलेल्या नागरिकांनी पोलीस निरीक्षक विलास काळे यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तात्काळ घटनेचा आरोपींचा शोध लावून मृतका च्या परिवाराला योग्य न्याय देण्याची आणि परिसरात कायदा सुव्यवस्था कडक करुन मोठ्या प्रमाणात सुरु असलेले अवैध धंधे बंद करण्याची मागणी केली आहे .
शनिवार ते रविवार रात्री च्या दरम्यान बोर्डा रोड वरील भारत पेट्रोल पंप समोर साटक – बनपुरी रहिवासी मृतक कल्पेश भगवान बावनकुळे या व्यक्तीची दोन अज्ञात आरोपींनी निघृण हत्या करून आरोपी घटनास्थळा वरून पसार होण्यात यशश्वी झाले असुन कन्हान पोलीस प्रशासना ने त्यांचा तपास सुरु केला परंतु घटनेला 24 तासा च्या वर लोटुन ही अद्यापही आरोपी चा सुराग पोलीसां च्या हाती न लागल्याने कन्हान पोलीसां च्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण झाले आहे .
हत्या ची घटना परिसरात आगी सारखी पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन स्थानिक नागरिक पोलीस प्रशासना बद्दल असंतुष्ट असुन घटनास्थळा पासून काही अंतरा वर मोठ्या प्रमाणात बिनधास्त पणे रात्रीच्या वेळी अवैध धंदे सुरु कन्हान पोलीस विभाग कारवाई का करत नाही अश्या चर्चेला उधाण आले आहे . बोर्डा मार्गावर अनेक छोटे मोठे खेडे गावं असुन सामान्य नागरिक दिवस भर ह्या कांद्री – बोर्डा महामार्ग ने आपल्या दररोज च्या कामाने बाहेर जात असून सायंकाळी त्याचा परती चा प्रवास असतो आणि किती तरी जेष्ठ नागरिक व्यायाम म्हणून त्या रस्त्यावर सकाळ – सायंकाळ च्या वेळी फिरायला येत असतात . या घटनेने आजू बाजूच्या संपूर्ण परिसराला हादरवून टाकले असुन स्थानिक नागरिक रात्रीच्या वेळी सुरक्षित आहे किंवा नाही ? असा प्रश्न आता निर्माण झाल्याने भाजपा पारशिवनी तालुकाच्या पदाधिकार्यांनी आणि संतापलेल्या नागरिकांनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांच्या नेतृत्वात आणि भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , कन्हान नप माजी नगराध्यक्ष शंकर चहांदे यांच्या उपस्थिती मध्ये कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांची भेट घेऊन या विविध गंभीर विषया वर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन
तात्काळ घटनेचा आरोपींचा शोध लावून मृतका च्या परिवाराला योग्य न्याय देण्याची , परिसरात कायदा सुव्यवस्था कडक करुन मोठ्या प्रमाणात सुरु असलेले अवैध धंधे बंद करण्याची , कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सर्व अतिमहत्वाच्या जागेवर सी.सी.टीव्ही . कॅमेरे बसविण्याची आणि व परिसरात दिवस – रात्र ग्रस्त वाढवण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी गुरूदेव चकोले , कामेश्वर शर्मा , अमोल साकोरे , रवि महाकाळकर , रिंकेश चवरे , विलास मेश्राम , शैलेश शेळके , सौरभ पोटभरे , ऋषभ बावनकर , सुरेंद्र बुधे , राणु शाही , हिरालाल गुप्ता , नंदु बावनकुळे , सतीश झलके , योगेश बावनकुडे , योगेश अकारे , अशोक पोटभरे , रामभाऊ धावडे , शंकर आकरे , श्याम बावनकुळे , प्रमोद देशमुख , पुंडलिक बावनकुळे शुभम बावनकुळे , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .