*शिक्षकदिनी स्वतंत्र पूर्व काळात जन्मलेल्या शिक्षकांचा सत्कार*
*आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष पूर्ण झालीत*
नरखेड़ प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
नरखेड़ – स्वातंत्र्याच्या या सुवर्ण मोहत्सवी वर्षात भारताच्या झालेल्या सर्वांगीण प्रगतीत शिक्षकांची फार महत्वाची भूमिका आहे. या गोष्टीची जाणीव ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नरखेड शहारातील अश्या शिक्षकांचा सत्कार केला ज्यांनी देशाचा पहिला स्वतंत्र दिवस आपल्या शालेय जीवनात साजरा केला आणि जे भारताच्या पहिला स्वतंत्र दिवसाचे साक्षीदार आहेत.
त्या कठीण काळात शिक्षणाचे महत्व समजून परिस्थितीवर मात करीत या सर्वांनी शिक्षण घेतले आणि शिक्षक म्हणून आयुष्यभर विद्यादानाचे बहुमूल्य काम केले तसेच खऱ्या अर्थाने महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचा शिक्षणाचा वसा या शिक्षकांनी घरोघरी पोहचविला.
आयुष्यभर पुरेल अश्याप्रकराचे शाश्वत विद्यादानाचे कार्य त्यांनी केले आणि भावी राष्ट्र निर्माण करण्यात आपले अतुलनीय योगदान दिले. त्यांच्या या कार्याची जाणीव ठेवत त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आदरणीय केशव राऊत गुरुजी वय 95 वर्ष, विश्वनाथजी वाघे वय 91 वर्ष, श्री रामचंद्र तवले गुरुजी वय 85 वर्ष, पुरुषोत्तम क्षीरसागर गुरुजी वय 84 वर्ष, भाऊरावजी धकीते गुरुजी वय 82 वर्ष, श्रीमती शकुंतलाबाई ढोके वय 80 वर्ष, रामनाथ पराते गुरुजी वय 79 वर्ष यांचा सत्कार करण्यात आला. हे सर्व शिक्षक म्हणजे नरखेड शहराच्या सामाजिक ठेवीमधील एक अमूल्य ठेवा आहे असे संजय चरडे यांनी म्हटले.
काही शिक्षक उपस्थित नसल्यामुळे त्यांचा सत्कार करता आला नाही.
यावेळी सर्व वरिष्ठ शिक्षकांनी त्यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल सलील देशमुख आणि उपस्थितांचे आभार मानले. सर्व शिक्षकांनी नरखेड शहरातील भावी पिढीला आशीर्वाद दिले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष संजय चरडे, राजूभाऊ जाऊलकर, प्रा. नरेश तवले, योगेश मांडवेकर, प्रशांत क्षीरसागर, भूषण खत्री, अजय सोमकुवर, आकाश जवादे, ईश्वर रेवतकर इत्यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य उपस्थित होते.