*अँड्.भोजराज सोनकुसरे यांचे हस्ते न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत बक्षिस वितरण*
मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेरः न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळा सावनेर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षक दिन निमित्त सर्व शिक्षकांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना बक्षिस वितरण करण्यात आले.
*अँड.भोजराज सोनकुसरे यांचे पुत्र.चि.प्रणव भोजराज सोनकुसरे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वप्रथम शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन प्रणव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेयोपयोगी वस्तु बक्षिस म्हणून देण्यात आले.*
*याप्रसंगी सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंढेले,सी न्युज भारत चे जिल्हा प्रतिनिधी श्याम चव्हाण, नागपुर समाचार चे मुकेश झरबडे,शाळा व्यवस्थापन समिती चे लोकप्रतिनिधी तुषार मदन उमाटे,शा.व्य.समिती च्या अध्यक्षा आशाताई कराळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता गणेश झाडे आणि भोजराज सोनकुसरे यांचे पुत्र प्रणव सोनकुसरे उपस्थित होते.*
*श्री.किशोर ढुंढेले यांनी विद्यार्थ्यांसाठी सांघीक खेळाचे आयोजन न.प.तर्फे करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या खेळातील आवडींना प्रोत्साहन दिले जाईल.तुषार उमाटे यांनी भोजराज सोनकुसरे यांनी केलेल्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले की त्यांनी आगळ्य वेगळ्या पद्धतीने मुलांचा वाढदिवस साजरा केला आहे .शाळेसाठी कधी अशी मदत लागल्यास मी नक्की शाळेला मदत करेल असे आश्वासन दिले.अँड् भोजराज सोनकुसरे यांनी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे विविध कार्यक्रमात सहभागी होत रहावे आणि प्राविण्य प्राप्त करावे असे बोधपर मनोगत व्यक्त केले.सी न्युज भारत चे जिल्हा प्रतिनिधी श्याम चव्हाण यांनीही या कार्यक्रमासाठी अँड् सोनकुसरे यांनी केलेल्या सहकार्याची सराहना केली.*
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ अनिता गणेश झाडे यांनी तर सूत्रसंचालन श्री.नरेंद्र चापरे सर आणि आभार प्रदर्शन श्री.मानिक रामटेके सर यांनी केले.*
*कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या जेष्ठ शिक्षक श्री सुरेश गजभे सर,जेष्ठ शिक्षिका तनुजा नंदेश्वर मॅडम, नर्मदा डवरे मॅडम, दिप्ती खोब्रागडे मॅडम,प्रणोती सहारे मॅडम,प्रणाली मोरे मॅडम आणि अंजली पगारे मॅडम यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाच्या शेवटी कुमार प्रणव यांचे हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल आणि चाॅकलेट यांचे वाटप करण्यात आले.*