डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली
रामटेक प्रतिनिधी- ललित कनौजे
रामटेक:-श्री. नरेंद्र तिडके महा. रामटेक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.
राज्यशास्त्र विभाग राष्ट्रीय सेवा योजना यांच्या तर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.संगीता टक्कामोरे होत्या मुख्य वक्ते म्हणून बार्टी चे समाजदुत राजेश राठोड, प्रा.डाॅ. महेंद्र लोधी उपस्थित होते. राठोड म्हणाले आंबेडकरांना विशिष्ट धर्माचे ठरवून ठेवण्याची समाजात वाईट परम्परा प्रस्थापित झाली आहे. ते कोणत्याही विशिष्ट धर्मा पुरते सीमित नाहीत. आपल्या देशात धर्माच्या नावाने समाज विभागले गेले आहेत. धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धत असते. मात्र विविधता असलेल्या धर्मातील वाईट प्रथांनी देशात संघर्ष निर्माण होत आहेत. आंबेडकरांच्या वैचारिक पार्श्वभूमीवर अशी काही अशास्त्रीय धर्म आज प्रासंगिक नाहीत. संकुचित धर्मांच्या सीमांनी आम्ही स्वतःला बांधून ठेवणे वाईट आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले . प्रत्येकांनी किमान एक तरी आंबेडकरांचा ग्रंथ वाचणे हे आजच्या दिवसाला खरी आदरांजली असेल.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. टक्कामोरे यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबासारखे विकासाच्या दिशेने जाण्याचा संदेश दिला. त्या म्हणाल्या आंबेडकरांनी अत्यंत वाईट परिस्थितीत शिक्षण घेवून केवळ एका समाजाचाच नव्हे संपूर्ण देंशाचा उद्धार केला. त्यांनी देशाला दिलेल्या संविधानानुसार या देशात लोकशाही टिकून आहे. आम्हाला मूलभूत अधिकार मिळाले ज्यामुळे आमचा विकास शाश्वत होऊ शकला आहे. देशात त्यांच्या विचारिक दृष्टिकोना नुसार तंतोतंत परिवर्तन झाले असते तर आम्ही आज भारत अन्य देशापेक्षा सुखी आणि विकासात देश म्हणून ओळखला गलां असता. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रा. महेंद्र लोधी यांनी केले.
कार्यक्रमाच्या पूर्वी सकाळी इंजिनिअर असोसिएशन नागपूर यांच्या तर्फे डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र राज्य स्तरावर तीन तासांची परीक्षा घेण्यात आली. त्यात महाविद्यालयाच्या 48 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. श्रीकांत मी. ब. भोवते यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. अमरीश ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. कल्पना पटेल, प्रा. स्वप्नील मनघे, डॉ. बाळासाहेब लाड. इत्यादी उपस्थित होते.