*कन्हान नदी वरील नवीन पुला वर लावलेले स्ट्रीट लाइट ची बत्ती गुल….लाईट नियमित सुरु ठेवा*
*”नितिन गडकरी साहेब येताच पुला वर रोशनाई……जाताच अंधाराचे साम्राज्य”*
*येत्या दोन ते तीन दिवसात नवीन पुला वर चे स्ट्रीट लाइट सुरु होतील – उपविभागीय अभियंता ठाकरे यांचे आश्वासन*
*कन्हान शहर विकास मंच पदाधिकारीर्यांचे नप मुख्याधिकार्यांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान नदी वरील नवीन पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री मा.नितिन गडकरी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले असुन पुला वर लावलेले स्ट्रीट लाइट हे मागील काही दिवसान पासुन बंद पडले असुन पुला वर अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी नप मुख्याधिकारी सौ.अर्चना मेंढे यांना भेटुन चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन कन्हान नदी वरील नवीन पुला वर लावलेले स्ट्रीट लाइट नियमित सुरु ठेवण्याची मागणी केली आहे .
कन्हान नदी वरील नवीन पुलाचे बांधकाम ५०.६३ कोटी रुपयाने करण्यात आले असुन पुला वर स्ट्रीट लाइट ची व्यवस्था करण्यात आली आहे . या नवीन पुला चे लोकार्पण याच महिन्यात १ सप्टेंबर ला केंद्रीय मंत्री मा.नितिन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आल्याने पुला वरुन रोज दिवस – रात्र सर्व प्रकारचे वाहन जाणे – येणे मोठ्या प्रमाणात सुरु झाली असुन पुला वर लावलेले स्ट्रीट लाइट हे काही दिवसान पासुन बंद पडल्याने पुला वर अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्याने मोठ्या अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही . कन्हान पोलीस स्टेशन समोरील मनसर कडुन येणाऱ्या वाहन चालकांना उजवीकडे वळण हे अपघातास निमंत्रण देत असुन मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे .
काही दिवसान पुर्वी एक दुचाकी वाहन चालक मनसर कडुन नागपुर ला जात असतांना पोलीस स्टेशन समोरील वळणावर चालकास वाहना वरील वेग नियंत्रणात करता आले नसल्याने वाहन चालक वाहना सह रोडावर खाली पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली असुन सुदैवाने रोडावर वाहन नसल्याने कुठ ली ही जीवीत हानि झाली नसुन मोठा अनर्थ टळला असुन कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच अध्यक्ष ॠषभ बावनकर यांच्या नेतृत्वात नप मुख्याधिकारी सौ. अर्चना मेंढे यांना भेटुन चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन राष्ट्रीय महामार्गा च्या अधिकार्यांना सोबत घेऊन चर्चा करुन कन्हान नदी वरील नवीन पुला वर लावलेले स्ट्रीट लाइट नियमित सुरु ठेवण्याची आणि अपघातास निमंत्रण देणाऱ्या वळणावर लवकरात लवकर मार्ग काढण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष ॠषभ बावनकर , सचिव सुरज वरखडे , मार्गदर्शक भरत सावळे , हरीओम प्रकाश नारायण , आकाश पंडितकर आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .
*नितिन गडकरी साहेब येताच पुला वर रोशनाई……जाताच अंधाराचे साम्राज्य*
कन्हान नदी वरील नवीन पुलाचे लोकार्पण भव्य दिव्य रोशनाई मध्ये केंद्रीय मंत्री मा.नितिन गडकरी साहेब यांच्या हस्ते पाळ पडले . त्यानंतर या पुलावरुन वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे .सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार कन्हान नदी वरील नवीन पुला चे लोकार्पण दरम्यान राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी एम.एस.सीबी कडुन पैश्याने लाईट विकत घेऊन दिखावा करुन पुला वर चे स्ट्रीट लाइट सुरु करुन भव्य दिव्य प्रकाशमय रोशनाई मध्ये पुलाचे लोकार्पण मा.नितिन गडकरी साहेब यांच्या हस्ते केले. त्यानंतर मा.नितिन गडकरी साहेब निघुन जाताच या नवीन पुला वर चे स्ट्रीट लाइट बंद पडुन अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्याने मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे . यावेळी राष्ट्रीय महामार्गा चे उपविभागीय अभियंता ठाकरे यांच्याशी संपर्क करुन स्ट्रीट लाइट बंद बाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि काही बिघाड आल्याने लाईट बंद करुन ठेवले आहे व स्ट्रीट लाइट सुरु करण्याचे कार्य सुरु असुन येत्या दोन ते तीन दिवसात नवीन पुला वर चे स्ट्रीट लाइट सुरु होतील असे त्यांनी आश्वासन दिले .