*”वैश्विक आरोग्य संरक्षण दिना निमित्य घोट येथे मोफत आरोग्य शिबीर”*

“वैश्विक आरोग्य संरक्षण दिना निमित्य घोट येथे मोफत आरोग्य शिबीर”

गढ़चिरोली प्रतिनिधि -सूरज कुकुड़कर

गढ़चिरौली:-

 

दिनांक १२ डिसेम्बर २०१९ रोजी सकाळी ९:०० ते दु. १:०० वा. पर्यंत, स्थळ: प्राथमिक आरोग्य केंद्र घोट ता. चामोर्शी येथे, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत वैश्विक आरोग्य संरक्षण दिनाचे औचित्य साधून भव्य मोफत आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हा स्तरावरील या योजनेतील अंगीकृत रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय व धन्वंतरी रुग्णालय गडचिरोली सहभागी असणार आहेत. तसेच या शिबिरात गोल्डन कार्ड चे वाटप करण्यात येणार आहे. शिबिरास येतांना लाभार्थ्यांनी मूळ रेशन कार्ड व ओळखपत्र तसेच जुने रेपोर्ट सोबत आणावे.

या शिबिरामध्ये हृदयरोग, कर्करोग, किडनी विकार, पोटाचे आजार, स्त्री रोग, अस्थी रोग, कर्ण विकार, औषधीशास्त्र इत्यादी आजाराच्या रुग्णाची तपासणी तज्ञ डॉक्टर कडून करण्यात येईल व पुढील उपचारा करिता संधर्भीत करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री.लिलाधर धाकडे जिल्हा प्रमुख यांनी केले आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …