*माननीय न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अपेक्षेनुसार पहिल्याच दिवशी केस निकाली काढून माननीय शुक्रे साहेबांची अपेक्षा पूर्ण केली*
सावनेर : माननीय न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी सावनेर येथील वरिष्ठ स्तर न्यायालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना अपेक्षा व्यक्त केली होती की कामकाजाच्या पहिल्या दिवशी एक तरी केस चा निकाल लागला पाहिजे त्यानुसार वरिष्ठ स्तर न्यायालयाचे न्यायाधीश पंकज नायगावकर यांनी अपेक्षा पूर्ण करत पहिल्याच दिवशी केस नंबर 784/13 महालक्ष्मी vs जयंत व इतर ही केस निकाली काढली सावनेर येथील वकील मंडळींनी यावेळी सन्माननीय न्यायमूर्ती पंकज नायगावकर यांचे अभिनंदन केले.
माननीय न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी एडवोकेट आभा जैन चे केले कौतुक.
एड. कुमारी आभा शैलेश जैन हिचे दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय उद्घाटन कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण संचालन केल्याबद्दल माननीय न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे यांनी तिला बोलावून तिचे कौतुक व अभिनंदन केले. तिच्या शिक्षणाबद्दल विचारणा केली.