*सावनेर येथे ग्राम रोजगार सेवक प्रशिक्षण* *कोथुळणा गावाचे सर्वेक्षण करून बनविला दश वार्षिक विकास आराखडा* *मनरेगा अंतर्गत बनविणार समृद्ध गाव*

*सावनेर येथे ग्राम रोजगार सेवक प्रशिक्षण*

*कोथुळणा गावाचे सर्वेक्षण करून बनविला दश वार्षिक विकास आराखडा*

*मनरेगा अंतर्गत बनविणार समृद्ध गाव*

सावनेर – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत पंचायत समिती सावनेर येथे 75 ग्रामपंचायती असून त्यात 68 ग्राम रोजगार सेवक कार्यरत आहे. मा.अपर मुख्य सचिव नंदकुमार साहेब यांच्या संकल्पनेतून पंचायत समिती सावनेर येथे 3 दिवशीय ग्राम रोजगार सेवक यांचे प्रशिक्षण ठेवण्यात आलेले आहे. प्रशिक्षण दिनांक २६/९/२०२२ ते २८/९/२०२२ या तीन दिवसाचे ग्राम रोजगार सेवक प्रशिक्षणात ग्राम रोजगार सेवक हा गावाचा दुवा असल्याने ग्राम पंचायत अंतर्गत नरेगाची कामे घेऊन गाव विकास कसा करायचा याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी नियोजन करणे करिता दि. २७/९/२०२२ मंगळवार ला कोथुळणा ग्राम पंचायतची निवड करण्यात आलेली होती.

कोथुळणा ग्राम पंचायतला दश वार्षिक नियोजन आराखडा बनविण्याकरिता सर्व ग्राम रोजगार सेवक यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे, जेणे करुन पुढे सावनेर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्राम पंचायतचे नियोजन करणे सोईचे होईल. प्रशिक्षण दरम्यान प्रत्येक व्यक्ती लखपती कसा करता येईल. तळागाळातील लाभार्थीला लाभ कसा देता येईल याचे नियोजन करण्यात येणार आहे. नियोजन करतानी कुटुंब सर्वेक्षण, गाव सर्वेक्षण, शिवार सर्वेक्षण करून दहा वर्षाचा नियोजन आराखडा तयार करण्यात येणार आहे. ग्राम पंचायत कोथुळणा अंतर्गत कार्यवृत्त मंजुरी घेऊन कामे सुरु करण्यात येणार आहे. यावेळी प्रशिक्षण उद्घाटन सोहळाला तालुक्याचे मा.तहसीलदार श्री.प्रतापराव वाघमारे, गटविकास अधिकारी श्री.दिपक गरुड, प्रशिक्षक म्हणून श्री.अविनाश सावरकर (सहायक कार्यक्रम अधिकारी, नरखेड), कु. योगिता काकडे (सहायक कार्यक्रम अधिकारी, हिंगणघाट), लाभले. तर यावेळी सहायक कार्यक्रम अधिकारी सावनेर श्री.दिनेश सोमुकवर, तांत्रिक सहाय्यक,श्री. प्रशांत वानखेडे, श्री.सुरज शेंडे, सरपंच श्री.हरिषचंद्र चौधरी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी श्री.धर्मेंद्र बन्सोड, श्री.अजय चाफेकर, श्री.आशिष वासे, शिक्षकवृंद, आशा वर्कर्स, ग्रामस्थ व सर्व ग्राम रोजगार सेवक आदी उपस्थित होते.

गाव समृद्ध करणे हा हेतू

दशवार्षिक सुक्ष्म नियोजन आराखड्याच्या माध्यमातून तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कुटुंबास 264 कामांची माहिती देणे तसेच त्या कामांपैकी अधिकाधिक कामांचा लाभ देत कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्याचा योजनेचा मानस तसेच गावामध्ये सार्वजनिक स्वरूपाची व शाश्वत विकासाची कामे करून गाव समृद्ध करणे, हाच दशवार्षिक नियोजनाचा मुख्य हेतू असल्याचे तहसीलदार श्री प्रतापराव वाघमारे व गटविकास अधिकारी श्री दिपक गरुड, आदींनी सांगितले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …