*अमरावती ते नरखेड रेल्वे लाईन वरील गणेशपूर ते सावंगी रस्त्याचे बांधकाम करा*
*असे निवेदन मा. सिनियर सेक्शन इंजीनियर यांना गणेशपूर येथील शेतकरी यांनी दिले*
नरखेड़ प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
नरखेड – रेल्वे लाईन वरील गणेशपूर जवळ रेल्वे लाईनवर असलेला अंडर ब्रिज क्रमांक ७८९/३ बनविण्याकरिता गणेशपूर ते सावंगी रस्ता वळविल्यामुळे रेल्वे हदीतील रस्त्याचे बांधकाम अपूर्ण असलेले त्वरित पूर्ण करण्यात यावे. कारण रेल्वे लाईनवर असलेला अंडर ब्रिज क्रमांक ७८९/३ या मध्ये २ ते 3 फुट माती गाळ साचलेला असल्यामुळे त्यामधून शेतक-यांना जाण्याकरिता कोणताच मार्ग नसल्यामुळे शेतकरी रेल्वे लाईनवरून जिवधोक्यात टाकून जात आहे. दि. २३/०९/२०२२ ला एका शेतक-याची मोटार सायकलचा रेल्वेने अपघात झाला. त्यामुळे शेतक-यांमध्ये व संपूर्ण गावकरी जनते मध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. दि. १३/०७/२०१२ शेतक-यांचा रेलरोको आंदोलन झालेले होता असून तरी पण रेल्वे विभागाने ‘कोणतीच कार्यवाही केलेली नसल्याने अपघात होत असून रेल्वे विभागाने त्वरित शेतक-यांचा रस्त्याचा मार्ग निकाली काढण्यात यावा. अन्यथा सर्व शेतकरी तीव्र आंदोलन करू असे निवेदन मा. सिनियर सेक्शन इंजीनियर (रेल्वेपथ) कार्यालय वरूड येथे देण्यात आले.
यावेळी गणेशपुर ग्रामपंचायत सदस्य तथा जनस्वराज्य फाउंडेशन अध्यक्ष छञपती वाडबुद्धे, युवा वरूड तालुका अध्यक्ष ओबीसी महासंघ सुरज धर्मे, मोहन करदाते,तुकाराम चौधरी,चंद्रशेखर कनिरे,संदीप उकार, फागुलालजी करदाते आदी शेतकरी उपस्थित होते.