*साईबाबा पत संस्थेची आमसभा संपन्न* *परतफेडीची इच्छा शक्तीच विकासाचे स्वप्न पूर्ण करू शकते – संस्थापक अशोक हटवार*

*साईबाबा पत संस्थेची आमसभा संपन्न*

*परतफेडीची इच्छा शक्तीच विकासाचे स्वप्न पूर्ण करू शकते – संस्थापक अशोक हटवार*

प्रतिनिधी- प्रशांत देवतारे
कोदामेंढी- संस्थेची वाटचाल प्रगती कडे असली तरी नियमित वेळेवर कर्ज परतफेडीकडे दुर्लक्ष होणे हि बाब कर्जदाराच्या आर्थिक अधोगती सोबतच संस्थेलाही अडचणीत आणू शकते.याची काळजी आपण सर्वांनी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अशोक हटवार यांनी केले.
स्थानिक साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या नवनिर्मित सभागृहात दि.२७/९/२०२२ मंगळवारला पार पडली.या वेळी सभेला मार्गदर्शन करताना अशोक हटवार बोलत होते.सभेच्या अध्यक्ष स्थानी बालकृष्ण पंचभाई होते.
व्यवस्थापक भैय्याजी बावनकुळे यांनी संस्थेच्या सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील व्यवहाराची माहिती दिली.अंकेक्षण अहवालाचे वाचन केले.याप्रसंगी संस्थेचे संथापक अशोक हटवार यांनी बँचलर ऑफ आर्टस इन मासकम्युनिकेशन अँड जर्नालिझम हि पदवी जुन-२०२२ च्या परीक्षेत प्रथम श्रेणी उत्तीर्ण केल्या बदल संस्थेतर्फे शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तसेच कोदामेंढी येथिल जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्याल येथील गुणवंत विध्यार्थाचा संस्थेतर्फे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यात श्रुती कमलेश पाटील (१२वी ),सेजल चंद्रप्रकाश फुलझेले (१२वी ),आकांक्षा महादेव वनवे (१०वी ),तन्वी निलकमल पात्रे (१०वी ) यांचा समावेश आहे.
सभेला संस्थेचे संचालक नरेश मेश्राम,शिवराम बावनकुळे,पुष्पा बारापत्रे,श्याम देवतळे,वसुराज पात्रे,आशा बावनकुळे, कर्मचारी प्रशांत देवतारे,तरुण गजभिये,श्रीकांत गायधने व दैनिक एजंट प्रशांत उके,राजकुमार बावनकुळे,शेखर सोनुले,रवींद्र मेश्राम,उमेश बावनकुळे,राजु शेंडे,महेंद्र तांबुलकर,देवानंद लिमजे व सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार रोखपाल प्रशांत देवतारे यांनी मानले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …