*कांन्द्री येथे जलशुद्धीकरण (RO) सयंत्राचे लोकार्पण*
*तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचा जल शुद्धीकरण हा एक सुदर मार्ग – जि.प अध्यक्ष सौ. रश्मी बर्वे*
*शुध्दीकरण प्रणाली हे सूक्ष्मजीवांना मारतो – सरपंच बलवंत पडोळे*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – परिसरातील ग्रामपंचायत कान्द्री येथे १५ वा वित्त आयोग जि.प.स्तर अंतर्गत जलशुद्धीकरण (RO)(क्षमता ५०० L.P. H)सयंत्राचे लोकार्पण जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. रश्मी बर्वे यांचा हस्ते आणि सरपंच बलवंत पडोळे यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले .
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. रश्मी बर्वे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन सांगितले कि
जलशुद्धीकरणाचा हा कदाचित सर्वात तात्काळ लाभ असुन ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या नळाच्या पाण्यात अनेक पदार्थ आणि अनावश्यक रसायने असतात . त्यामध्ये फ्लोराईड, बॅक्टेरिया, विषारी रसायने; त्यामुळे तुमचे आरोग्य कोणाच्याही हातात सोडू नका.
तसेच सरपंच बलवंत पडोळे यांनी सांगितले कि पर्यावरण संरक्षण एजन्सीचा अहवाल आहे की जगातील 90 टक्के पाणीपुरवठा कोणत्याही प्रकारच्या उपचारांशिवाय; पिण्यासाठी अयोग्य आहे. पाण्यात सूक्ष्मजीव असू शकतात; ज्यामुळे अतिसार, उलट्या आणि मृत्यू देखील होऊ शकतो. पाणी शुध्दीकरण प्रणाली या सूक्ष्मजीवांना मारते जेणे करून पाणी पिण्यास सुरक्षित होईल. पाणी सुरक्षित करण्यासाठी अनेक प्रकारे शुद्ध केले जाते; जसे की उकळणे, क्लोरीन किंवा आयोडीनसह रासायनिक उपचार आणि गाळण्याची प्रक्रिया असुन नागरिकांनी पाणी उकळुन आणि गाळुण प्यावे असे कडकडीचे आव्हाहन जि.प अध्यक्ष सौ. रश्मी बर्वे व सरपंच बलवंत पडोळे यांनी नागरिकांना केले आहे .
या प्रसंगी पंचायत समिति पारशिवनी सभापती सौ.मीना कावळे , धनराज कारेमोरे , बैसाखू जनबंधु , प्रकाश चाफले , शिवाजी चकोले , महेश झोडावणे , चंद्रशेखर बावनकुळे , राहुल टेकाम , सदस्या सौ.आशा कनोजे , दुर्गा सरोदे , रेखा शिंगणे , विभा पोटभरे , वर्षा खडसे , दिनकर इंगळे(ग्रा.वि.अधिकारी)
राजू देशमुख , वसंतराव लोहकरे ,गणेश सरोदे , गोपाल मस्के , अभय जांबूतकर , निकेश मेश्राम , संदीप सरोदे , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .