*राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवाड्याच्या औचीत्याने मूक बधिर शाळा सावनेर तर्फे पत्रकारांचा सन्मान सोहळा* *पत्रकार हे नागरिकांचे खरे न्यादेवता – मुख्याध्यापिका सौ.सुवर्णा महाशब्दे*

*राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवाड्याच्या औचीत्याने मूक बधिर शाळा सावनेर तर्फे पत्रकारांचा सन्मान सोहळा*


*पत्रकार हे नागरिकांचे खरे न्यादेवता मुख्याध्यापिका सौ.सुवर्णा महाशब्दे*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेरः राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवाड्याच्या औचीत्याने दिनांक 1/10/2022 ला समाजातील तळागाळातील समस्यांना निस्वार्थीपणे वाचा फोडुन न्याय मीळवूण देणार्या पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.

*कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मराठी पत्रकार संघ सावनेर चे पूर्व अध्यक्ष श्री तेजसिंग सावजी तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे वैद्यकीय मार्गदर्शक मा.डॉ.अमित चेडे सर लाभले.याप्रसंगी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढूँढेले,सचिव लक्ष्मीकांत दिवटे,उपाध्यक्ष श्री.निलेश पटे,सदस्य श्री.पियूष झिंझुवाडीया, श्याम चव्हाण,निर्भिड चे संपादक पांडुरंग भोंगाडे,सकाळ चे पत्रकार विजय पांडे,मुकेश झरबडे इत्यादी पत्रकार उपस्थित होते.*

*शाळेचे वैद्यकीय मार्गदर्शक डॉ अमित चेडे सर व मुख्याध्यापिका सौ.सुवर्णा महाशब्दे यांच्या हस्ते उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मानपत्र,श्रीफळ,भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.अमित चेडे यांनी संस्थेच्या माध्यमातून पत्रकारितेमध्ये कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यामागची भूमिकेवर विशद केली.

आयोजनाचे अध्यक्ष तेजसिंग सावजी यांनी पत्रकारांचा सत्कार संस्थेच्या वतीने प्रथमच सावनेर शहरात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला व पत्रकार हा कुणाचीही व कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता आपले कार्य निस्वार्थ पणे करीत राहतो परंतु या सन्मानामुळे आम्हा पत्रकार बांधवांना प्रोत्साहन मिळाल्याचे सांगून शाळेला सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.*

*सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ चे अध्यक्ष किशोर ढुंढेले यांनी पत्रकारांच्या भावना मांडत म्हटले की आजच्या काळात पत्रकारिता करणे खुप कठीण असुन पत्रकार हा सगळ्यांच्या समस्यांना वाचा फोडून न्याय देण्याकरिता पुढाकार घेतो परंतु तो जेव्हा समस्येशी झंज देतो तेव्हा मात्र त्याच्या सोबतीला कुणी उभे रात नाही ही मोठी शोकांतिका आहे.तरीही तो आपल्या कर्तव्याचे पालन करुण आपली वेगळी ओळख निर्माण करुण समाजात आपले स्थान निर्माण करतो हे महत्वाचे.

तर निर्भीड चे संपादक पांडुरंग भोंगाडे यांनी आपले विचार व्यक्त करत म्हटले की मी म्हणजे पत्रकारीता नाही व जी बातमी लपवून ठेवण्याचा प्रयत्न होतो ती प्रकाशित करणे म्हणजे खरी पत्रकारिता.पत्रकार जेव्हा बातमी लीहीतो त्या बातमीची एक बाजु बघुन निर्णय घेणारे समाजात अनेक आहेत परंतू जे दुसरी बाजु ही समझुन घेतात त्यांनाच त्या बातमीचे व पत्रकाराचे गांभीर्य कळते.आम्ही जेव्हाही एखादी बातमी लीहीतो तेव्हा आम्हाला त्या बातीमीच्या सर्व बाजु तपासूनच तश्या शब्दात ती मांडावी लागते पत्रकार कुणाचाही वैरी नसुन समाजातील समस्यांचा आरसा आहे असे मत याप्रसंगी व्यक्त केले.

*सर्व पत्रकारांनी सत्काराला उत्तर दिले.संस्थेचे सचिव श्री नारायण समर्थ यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुवर्णा महाशब्दे यांनी पत्रकारांविषयी भावना व्यक्त करून आभार व्यक्त केले तर श्री संजय लुंगे यांनी कार्यक्रमाचे संचलन केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.*

 

*या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.यावेळी सांकेतिक भाषेत विद्यार्थ्यांना माहिती दिली.पत्रकार बांधवांच्या या सन्मान समारंभाच्या आयोजनाच्या यशस्वीतेकरिता सुनील राठोड,विनोद घोलप,अजय वानखेडे,राजु दलाल,सौ.कविता केळापुरे,सौ.ज्योती राऊत,सौ.दुर्गा चेडे सह सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारींनी परिश्रम घेतले*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …