*लिंगा अत्याचार आणि खून प्रकरणी महिला आयोगाकडून दखल*
*कळमेश्वर तहसील कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बोलावली बैठक*
*महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांना शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निवेदन*
कळमेश्वर प्रतिनिधी सतीश नांदे
कळमेश्वर तालुक्यातील लिंगा गावामध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरण राज्यासह देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गाजल्या ने सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. विविध सामाजिक संघटनेच्या वतीने या घटनेवर रोष व्यक्त करण्यात आल्याने प्रशासनाकडूनही अशा घटना वारंवार घडू नये याकरिता योग्य पावले उचलली जावी म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीने कळमेश्वर आणि सामनेर तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक राज्य महिला आयोगाच्या वतीनेउद्या दिनांक 12 डिसेंबर 2019 रोजी कळमेश्वर तहसील कार्यालयात बोलावली आहे.
या बैठकीला महिला बाल कल्याण अधिकारी,मुंबई सदस्य वसंती देशपांडे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नागपूर मुश्ताक पठाण यांनी उपविभागीय अधिकारी,तालुक्यातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, उपविभागीय अधिकारी सावनेर, कळमेश्वर सावनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार हे सर्व अधिकारी संयुक्तरित्या उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
माहिती न करता ठेवले सालदार
या झालेल्या लिंगा या गावातील हत्याकांडातील आरोपी संजय पुरी याची कोणतीच माहिती घेता,तसेच हा कुठून आला,त्यावर कोणते गुन्हे आहे तो काय करत होता त्याची कुठल्याही प्रकारे चौकशी न करता संजय भारती या नागपूर येथील शेती मालकाने त्याला कमी पैशात सालदार म्हणून ठेवले त्यामुळे हा हत्याकांड संजय भारती हासुद्धा तितकाच गुन्हेगार आहे असे नागरिकांकडून बोलले जात आहे.
नापिकी व हतबल झालेल्या शेतकऱ्याची जमीन अल्पदरात मिळत असल्याने कळमेश्वर तालुक्यातील लिंगा,तेलगाव,नांदिखेडा,मोहगाव,उबाळी,उपरवाही, सोनेगाव मोहपा,लोणारा,येरला,दहेगाव व इतर गावातील शेतकऱ्याच्या शेती नागपूर येथील धनाढ्य लोकांनी कमी दरात विकत घेतल्या व या शेतीवर ते सालदार ठेवून उत्पादन घेऊ लागले पण सालदार ठेवताना कोणतेच निकष त्यांनी पाडले नाही व ते आपल्या शेतात फक्त रविवार व शनिवार या दिवशी मध्यप्राशन व मौज मस्ती करण्यासाठी येत असतात त्यामुळे या जिल्ह्यात अशा प्रकारच्या अत्याचार च्या घटना होत असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेस कोण जबाबदार? सदर घटनेला आळा घालण्यासाठी महसूल विभागातर्फे तहसीलदार उपविभागीय अधिकारी,पोलीस प्रशासन यांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
कळमेश्वर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कर्मचारी वाढवण्याची मागणी
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील गावांची संख्या बघता या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अत्यंत तोकड्या प्रमाणात आहेत यामुळे कळमेश्वर तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा स्टाफ कमी पडत असल्याने संपूर्ण तालुक्यात पोलिसिंग करण्यासाठी कळमेश्वर पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंबियासह राहण्यासाठी क्वाटर ची व्यवस्था नसल्याने त्यांना इतरत्र राहून नोकरी करावी लागत असल्याने अशा प्रकारच्या परिस्थिती उद्भवल्यास पोलीस कर्मचारी वेळेवर पोहोचू शकत नाही शिवाय या पोलीस स्टेशनमध्ये असलेले पोलीस वाहन सतत नादुरुस्त असते आणि ते जुने झाले असल्याने या ठिकाणी नवीन वाहन आणि महिलां प्रति घडलेल्या गुन्ह्यासाठी एका वेगल्या वाहनाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
*बलात्कार आणि खुनासारख्या प्रकरणांना आळा घालण्याची केली मागणी
शिवसेना महिला आघाडी नागपूर जिल्हा ग्रामीण च्या वतीने घडलेल्या दुर्दैवी अत्याचार आणि खून प्रकरणासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे या देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की नुकत्याच घडलेल्या लिंगा येथील एका पाच वर्षीय मुलीवर अत्याचार यांनी खून प्रकरणी आरोपी संजय पुरी यास फास्टट्रॅक न्यायालयामध्ये प्रकरण चालून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच समाजातील महिला आणि मुली त्या सुरक्षित नसल्याचे या प्रकरणावरून उघडकीस आल्याने महिलां प्रती कायदे कडक करावे महिलांसाठी तालुकास्तरावर विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी तसेच शाळा महाविद्यालय आणि परिसरामध्ये मजनु गिरी करणाऱ्यांवर ठोस पावले उचलून कडक कारवाई करावी तसेच कुठल्याही गावांमध्ये नवीन व्यक्ती परप्रांतीय राहायला आल्यास पोलीस विभाग गावातील पोलीस पाटील ग्रामसेवक आणि सरपंच यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित व्यक्तीची नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये त्या व्यक्तीला पाठवावे जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल अशी मागणी जिल्हा महिला शिवसेना च्या वतीने जिल्हा संघटिका नागपूर ग्रामीण सौ वंदना अशोक लोणकर यांनी आज पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण राकेश ओला यांना निवेदन सोपवून केली आहे सौ वंदना लोणकर यांच्यासमवेत निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य श्रीमती नंदा लोहबरे, जिल्हा संघटिका अंजुषा बोधनकर, रचना कनेर नागपूर शहर संपर्क प्रमुख मंदाकिनी भावे, सुरेखा खोबरागडे, उपजिल्हा प्रमुख सुशिला नाईक, उपजिल्हाप्रमुख माधुरी चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
छायाचित्रांमध्ये शिवसेना महिला जिल्ह्याच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देताना