*समर्पण फाउंडेशन सावनेर व प्रगती दुर्गा उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती चे अवचित्य साधून भव्य रोगनिदान शिबिर संपन्न*
मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेर – दिनांक 2/10/2022 रोज रविवारला शहरातील प्रसिद्ध सामाजिक संस्था समर्पण फाउंडेशन व प्रगती दुर्गा उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोगनिदान व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शहरातील तज्ञ चिकित्सकांकडून शिबिरात आलेल्या रुग्णांची योग्यरीत्या तपासणी करून त्यांना औषध देखील देण्यात आले. शिबिरात नेत्र तपासणी, दंत तपासणी ,मूखरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, हृदयरोग तपासणी, मधुमेह तपासणी ,रक्तदाब तपासणी, स्त्रीरोग तपासणी ,बालरोग तपासणी, जनरल तपासणी, होमिओपॅथिक, औषधोपचार आयुर्वेदिक औषध उपचार इत्यादी सेवा पुरविण्यात आल्या या शिबिरामध्ये शहरातील ज्येष्ठ चिकित्सक डॉ.
कृष्णराव भगत,डॉ. विलास मानकर डॉ. नितीन पोटोडे डॉ. राहुल दाते डॉ. स्वप्नील काळे डॉ.आशिष चांडक डॉ. निलेश कुंभारे डॉ.प्रवीण चव्हाण डॉ. शिवम पुण्यानि डॉ.अनुप जैस्वाल डॉ. नेहा जयस्वाल डॉ. वैशाली दाते,डॉ. उमेश गायकवाड डॉ. प्रीतम नीचत डॉ.छत्रपती मानापुरे, डॉ अतुल टाकसाडकर,डॉ.प्रशांत राजपूत डॉ.पराग घाटोडे व डॉ मिसेज घाटोडे,डाॅ.अतुल टाकसाळकर यांनी सेवा दिल्या
या स्वास्थ शिबिराचे समन्वयक समर्पण फाउंडेशनचे डॉ विलास मानकर ,डॉ नितीन पोटोडे डॉ राहुल दाते होते.
शिबिराचे योग्य नियोजन झाल्याने या शिबिरात 986 च्या वर रुग्णांनी स्वास्थ सेवेचा लाभ घेतला तसेच 69 रक्तदात्यांनी रक्तदान केले जीवन ज्योती ब्लड बँक नि सेवा दिली व सर्व रुग्णांना मोफत औषधांचे देखील वितरण करण्यात आले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तुषार उमाटे,सोनू नवधिंगे, विनोद कुमार बागडे,प्रवीण नारेकर, अभिषेक मुलमुले, अभिषेक सिंग गहरवार मनीष चित्तेवाण, नरेंद्र ठाकूर इत्यादींनी प्रयत्न केले.