*डुमरी खुर्द एचपीपंप महामार्गा वर यश ढाबा चे कर्मचार्यांनी आपसी भांडणात एका युवकाची केली हत्या* *एका महिन्याचा आत दुसरी हत्या ची घटना , कन्हान पोलीसांचा कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण*

*डुमरी खुर्द एचपीपंप महामार्गा वर यश ढाबा चे कर्मचार्यांनी आपसी भांडणात एका युवकाची केली हत्या*

*एका महिन्याचा आत दुसरी हत्या ची घटना , कन्हान पोलीसांचा कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – पारशिवनी तालुक्यातील नागपुर – जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील यश ढाबा चे कर्मचार्यांनी आपसी भांडणात एका युवकाची हत्या केल्याने परिसरात एकच खळखळ उडाली असुन एका महिन्याचा आत दुसरी हत्या ची घटना घडल्याने कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे व पोलीस स्टाॅप यांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण झाले असुन सतत परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
सुत्रान कडुन मिळत असलेल्या माहिती नुसार आज गुरुवार दिनांक ६ आॅक्टोंबर ला पहाटे च्या दरम्यान एचपी पंट्रोल पंप च्या बाजुला चाय टपरी जवळ यश ढाबा चे कर्मचारी अमन अशोक श्रीवास्तव वय २२ वर्ष व राजु दुबे वय ४५ यांचे आपसात भांडण होत असतांना आरोपी अमन श्रीवास्तव ह्याने काही लोखंडी वस्तु ने डोक्याचे मागील भागात मारून हत्या केली .
सदर घटनेची माहिती यश ढाबा चे कर्मचार्यांनी कन्हान पोलीसांना दिली असता पोलीस स्टेशन चे मंगेश सोनटक्के व अरुण कुमार सहारे हे आपल्या स्टाॅप सह घटनास्थळी पोहचले असता पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले असुन पोलीसांनी आरोपी अमन अशोक श्रीवास्तव ला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे .


सदर घटना गंभीर्याने लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान व कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. सतत परिसरात वाढत असलेल्या गुन्हेगारी मुळे नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने कन्हान पोलीस स्टेशन येथे तात्काळ संयुक्त कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …