*कन्हान येथे राजा रावण मडावी यांचा हुतात्मा दिवस आणि विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांची जयंती थाटात साजरी*
*गोंडवाना गणतंत्र पार्टी द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान यादव नगर येथील रहिवासी बंडू ईडपाते यांच्या निवास स्थानी गोंड सम्राट महात्मा राजा रावण मडावी यांचा हुतात्मा दिवस रावण गोंगो व विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी व नागपुर जिल्हा परिषद सदस्य मा.हरीश उईके यांच्या हस्ते व गोंडवाना गणतंत्र पार्टी उपाध्यक्ष सुखलाल मडावी , गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हाध्यक्ष धनराज मंडावी , गोंडवाना गणतंत्र पार्टी कन्हान शहर अध्यक्ष सोनु मसराम , गोंडवाना गणतंत्र पार्टी नागपूर जिल्हा महिला प्रकोष्ठ संघटक सुनिता उईके यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राजा रावण मडावी व विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व पुष्प दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली .
यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी राजा रावण मडावी व विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगरसेवक राजेश यादव , कांद्री ग्रामपंचायत सदस्य राहुल टेकाम , गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा उपाध्यक्ष रामलाल पट्टा , बहुजन समाज पार्टी पारशिवनी तालुका अध्यक्ष राजेंद्र फुलझले , कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष व ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य ऋषभ बावनकर , शहर विकास मंच सचिव सुरज वरखडे , राजेश सायम , निराश कोडवते , बंडू एरपाटे , नामदेव कोडापे , बालचंद भेलावी , शंकर इनवते , संदीप परते , राजेश फुलझाले , अभिजित चांदूरकर , राजकुमार मेश्राम , पप्पू धरणे , अनिलभाऊ पंधराम , राजेश टेकाम , नितीन इरपाते , राजवीर मडावी सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .