*कन्हान परिसरात राष्ट्रपीता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची संयुक्त जयंती थाटात साजरी*
*विविध संघटने द्वारे ठिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरात व परिसरात जगाला अहिंसा , सत्य आणि सहिष्णुता यांची शिकवण देणारे राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या १५३ व्या जयंती व जय जवान जय किसान घोषणेचे प्रणेते भारतरत्न माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या ११८ व्या जयंती निमित्य विविध संघटने द्वारे विविध ठिक ठिकाणी संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करुन महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
*कन्हान शहर विकास मंच*
कन्हान शहर विकास मंच द्वारे राष्ट्रपीता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले होते .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे नवनियुक्त कोषाध्यक्ष प्रणय बावनकुळे यांच्या हस्ते व जेष्ठ नागरिक नंदकिशोर यादव , मोहनसिंग यादव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे यांनी महात्मा गांधी , लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव सुरज वरखडे , सहसचिव प्रकाश कुर्वे , कोषाध्यक्ष प्रणय बावनकुळे , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , हरीओम प्रकाश नारायण , अनुराग महल्ले , योगराज आकरे , शाहरुख खान , मंगेश खंगार , विनोद खडसे , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .
*भाजपा पारशिवनी तालुका , कन्हान – कांद्री शहर*
कन्हान – कांद्री परिसरात भाजपा पारशिवनी तालुका व भाजपा कन्हान – कांद्री शहर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपीता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात आले . पोलीस स्टेशन जवळ गांधी चौक येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या हस्ते पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता , भाजपा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , माजी नप नगराध्यक्ष शंकर चहांदे यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . तसेच कांद्री येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांनी पुष्प हार माल्यार्पण केले असुन , भाजपा कांद्री शहर अध्यक्ष गुरुदेव चकोले , योगेश वाडीभस्मे , यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कामेश्वर शर्मा , संजय रंगारी , विक्की सोलंकी , रंजीत शिंदेकर , नप गटनेता राजेंद्र शेंदरे , दिपनकर गजभिये , अमोल साकोरे , विनोद किरपान , श्रवण वतेकर , रवि महाकाळकर , शिवाजी चकोले , अजय लोंढे , हितेश साठवणे , सौरभ पोटभरे , आकाश वाडणकर , नारायण गजभिए , मोती हारोडे , विजय शेंदुरकर , राजन सिंग , कैलाश चौबे , शिवकुमार कनोजिया , कृष्णकुमार रघुवंशी सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .
*युवक काँग्रेस , कन्हान*
कन्हान युवक काँग्रेस द्वारे राष्ट्रपीता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित युवक काँग्रेस चे आकीब सिद्दीकी यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित
अजय कापसीकर यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित युवक काँग्रेस च्या पदाधिकार्यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी अनस शेख , सोहैल सैय्यद , शाहनंद शेंडे , रशीद शेख , शुभम गजभिए , सागर हमने , अतुल मानकर , साहिल खान सह आदि पदाधिकारी उपस्थित होते .
*येसंबा ग्रामपंचायत कार्यालय , कन्हान*
परिसरातील येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित येसंबा ग्रामपंचायत सरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुष्प माल्यार्पण पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी सरपंच धनराज हारोडे यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . त्यानंतर गावात स्वच्छता अभियान राबवुन जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी अंगणवाडी सेविका माया चकोले , मदतनिस कांता गजभिये , किसनी बाई घरजाळे , नानुबाई महाल्ले , बबनराव घरजाळे ,कुमार गढे , गामा चकोले , अनिल नानवटकर , नंदलाल धुर्वे , महेश राऊत , भोलानाथ चौधरी , यशवंत महाल्ले , सह आदि नागरिक व बालगोपाल मोठ्या संख्येत उपस्थितीत होते.
*हिराबाई उच्च प्राथमिक शाळा , कन्हान*
हीराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शाळेचे संचालक नरेंन्द्र वाघमारे यांचा हस्ते महात्मा गांधी यांचा प्रतिमेला पुष्प हार माल्यापर्ण करुन कार्यक्रमाची सुरवात करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व शाळेच्या शिक्षक शिक्षकांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी मुख्याध्यापिका वंदना रामपुरे , जयश्री पवार , आयशा अंसारी , मंदाकिनी रंगारी , हेमंत चांदेवार , हेमंत वंजारी , सह आदि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.