*कन्हान शहर विकास मंच द्वारे शहिद भगत सिंह यांची जयंती साजरी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान तारसा रोड शहिद चौक येथे शहर विकास मंच द्वारे शहिद भगत सिंह यांच्या ११५ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे नवनिर्वाचित सदस्य सुनिल हारोडे यांच्या हस्ते शहिद स्मारका वर आणि शहिद भगत सिंह यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , यांनी भगत सिंह यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित मंच पदाधिकार्यांनी व सदस्यांनी शहिद भगत सिंह यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत भगत सिंह यांची जयंती साजरी करण्यात आली .
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , हरीओम प्रकाश नारायण , सुनिल हारोडे , शुभम नागमोते , स्वप्निल वरखडे सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .