*कल्पेश बावनकुळे हत्याकांड चा पर्दाफाश , दोन आरोपी गिरफ्तार* *हत्या करण्याच्या उद्देश काय ? गुलदस्त्यात* *सकरदरा पोलीसांनी आरोपी पकडण्यास केली मौलाती कामगिरी*

*कल्पेश बावनकुळे हत्याकांड चा पर्दाफाश , दोन आरोपी गिरफ्तार*

*हत्या करण्याच्या उद्देश काय ? गुलदस्त्यात*

*सकरदरा पोलीसांनी आरोपी पकडण्यास केली मौलाती कामगिरी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान परिसरातील बोर्डा रोड वरील पेट्रोल पंप जवळ दोन अज्ञात आरोपीनतांनी कल्पेश बावनकुळे याची निर्दयतेने हत्या केल्या प्रकरणी दोन आरोपी सकरदरा पोलीस स्टेशन च्या सहकार्याने पोलीसांना पकडण्यास अखेर यश प्राप्त झाले असुन अन्य आरोपी आणि हत्या करण्याचा उद्देश काय हे अजुनही गुलदस्त्यात असल्याने कन्हान पोलीस पुढील तपास करीत आहे .


पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार शनिवार दि.१० सप्टेंबर २०२२ ला रात्री च्या सुमारास डिजे मालक कल्पेश बावनकुळे हा नागपुर येथील गणेश विसर्जनात डि जे वाजविण्याचा ऑडर करून डि जे ऑपरेटर सुरज सुनिल ढोबळे व जितेंद्र रमेश ढोबळे हे नागपुर वरून रात्री ११.३० वाजता घरी बनपुरी ला दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४९ बी एल ५६२८ अँक्टीव्हाने परत जात असतांना कल्पेश दुचाकी चालवित असुन दोघे मागे बसले होते. कन्हान वरून बोर्डा रोडने जात असतांना बोर्डा रोड वरील पंप च्या थोडया सामोर काही अंतरावर नागपुर चारपदरी महामार्गा जवळ रात्री १२.३० वाजता दरम्यान अज्ञात आरोपीने त्यांची दुचाकी अडवित दुचाकीसह तिघाना खाली पाडले असता ते उठुन जिव वाचविण्यास पेट्रोल पंप कडे पळतांना आरोपीने कुठलेही कारण नसतांना कल्पेश ला पकडुन धारदार शस्त्राने पाठी वर , पोटावर, छातीवर, हातावर व गळयावर सपासप ३० ते ३८ घाव मारून निर्दयतेने हत्या करून आरोपी पळुन गेले होते. तर मागे स्वार दोघे सुरज व जितेंद्र हे पेट्रोल पंप पळुन गेल्याने सुखरूप वाचले. कन्हान पोलीसांनी फिर्यादी वडील भगवान राघोबाजी बावनकुळे यांचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे ला अज्ञात आरोपीं विरोधी अप क्र ५२५/२२ कलम ३४१, ३०२, ३४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करून डीजे मालक कल्पेश बावनकुळे ची अज्ञात आरोपींंने निर्दयतेने हत्या केल्याने ही हत्या डिजे व्यवसायातुन केली असल्याचा प्राथमिक अंदाजा वरून कन्हान पोलीसचे दोन पथक व स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण चे पथक हत्येच्या आरोपींताचा शोध करित शोध घेत १३ दिवस झाल्यावर सकरदरा पोलीस स्टेशन अंतर्गत ताजबाग परिसरात काही दिवसा पुर्वी शेख नौशाद वर आरोपी आशिष उर्फ मोनु मनपिया व अन्य दोन आरोपीने रिवाल्वर तानुन जिवे मारण्याच्या पर्यंत केल्या प्रकरणी सकरदार पोलीसांनी आशिष मनपिया वय ३० वर्ष राह भिलगाव, नागपुर व अन्य दोन आरोपी ला अटक करून तपास करित असतांना आशीष उर्फ मोनु मनपिया यांनी बोर्डा रोड कांद्री कन्हान येथे कल्पेश बवनकुळे यांची हत्या केल्याचे कबुली दिल्याने कन्हान पोलीसांना माहीती दिल्याने यातील आरोपी विक्की क्रिष्णा उके वय ३० वर्ष राह.जवाहर नगर पांधन रोड कन्हान यास त्याचा घरुन कन्हान पोलीसांनी पकडुन अटक केली असुन हत्येत वापरण्यात आलेली चारचाकी वाहन सुध्दा ताब्यात आहे .

तर सकरदार पोलीसाच्या ताब्यात आशिष उर्फ मोनु मनपिया असल्याने कल्पेश बावनकुळे हत्येचे दोन आरोपी अटक करण्यात आले असुन अन्य आरोपीचा व मुख्य सुत्रदार आणि हत्या करण्याच्या उद्देश कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.

कन्हान पोलीसांना आरोपी विक्की उके चा तपास करण्याकरिता (दि ३०) सप्टेंबर पर्यंत पीसीआर मिळाला आहे.
सदर कार्यवाही सकरदरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनजय पाटील , ए पी आव्हाड , एपीआय कशोधन , कामठी उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान , गुन्हे शाखे चे पोलिस निरिक्षक कोकाटे व पथक , कन्हान थानेदार विलास काळे , संपोनि सतिष मेश्राम , ए पी आय प्रयाग फुलधेले , नरेश वरखडे , गणेश पाल , खुशाल रामटेके , मंगेश ढबाले , सम्राट वनपरेती , वैभव बोरपल्ली , अतिश मानवटकर आदी ने सक्रिय सहभाग घेत कामगिरी बजावित आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …